राजगुरुनगर न्यायालयाबाहेर वकिलांचे आंदोलन

By admin | Published: April 25, 2017 03:53 AM2017-04-25T03:53:00+5:302017-04-25T03:53:00+5:30

वकिलांच्या विरोधी असणारे विधेयक बिल कायद्यात दुरुस्ती व्हावी, यासाठी राजगुरुनगर येथे वकिलांच्या वतीने न्यायालय आवाराबाहेर या बिलाची होळी केली.

Advocates movement outside Rajgurunagar court | राजगुरुनगर न्यायालयाबाहेर वकिलांचे आंदोलन

राजगुरुनगर न्यायालयाबाहेर वकिलांचे आंदोलन

Next

दावडी : वकिलांच्या विरोधी असणारे विधेयक बिल कायद्यात दुरुस्ती व्हावी, यासाठी राजगुरुनगर येथे वकिलांच्या वतीने न्यायालय आवाराबाहेर या बिलाची होळी केली.
प्रस्तावित वकील कायदा दुरुस्ती विधेयक २०१७ खेड बार असोसिएशनच्या वतीने निषेध करून वकीलविरोधी बिल रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार बी. बी. बोडके यांना देण्यात आले. लॉ कमिशन आफ इंडियाने हे विधेयक पारित केले आहे. त्यावर अंतिम मंजुरी होणार असून हे बिल वकीलविरोधी आहे. वकिलांचा अधिकार व हक्कांवर यामुळे गदा येणार आहे.
त्यामुळे वकिलांना प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे काम करता येणार नाही. या विधेयक बिलात असलेल्या जाचक त्रुटींमुळे वकील न्यायालय व पक्षकार संघर्ष वाढणार आहे. त्यामुळे खेड बार असोसिएशनच्या वतीने या आंदोलनात सामील होऊन या बिलाचा निषेध करीत आहे, असे खेड बारचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल राक्षे यांनी सांगितले.
दरम्यान, राजगुरुनगर न्यायालयासमोर या बिलाची होळी करण्यात आली. नायब तहसीलदार बोडके यांना खेड बार असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या वेळी अ‍ॅड. अनिल राक्षे, उपाध्याक्ष अ‍ॅड. आश्विनी पानसरे, सचिव अ‍ॅड. संजय गोपाळे, अ‍ॅड. गणेश गाडे, अ‍ॅड. पोपटराव तांबे, अ‍ॅड. बी. एम. सांडभोर, अ‍ॅड. अर्चना किर्लोस्कर, अ‍ॅड. सुलभा कोटबागी, अ‍ॅड. स्वाती आचार्य, पूनम पाटोळे, स्वाती थिगळे, स्मिता शिंदे
उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: Advocates movement outside Rajgurunagar court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.