Ather Energy ची डिलरशीप मिळवण्याचा प्रयत्न अंगलटी; तरुणाला तब्बल २१ लाखांना गंडा

By विवेक भुसे | Published: May 4, 2023 04:02 PM2023-05-04T16:02:56+5:302023-05-04T16:04:11+5:30

आय टी कंपनीत असलेल्या तरुणाने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर इंटरनेटवर व्यवसायाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता

Aether Energy's attempt to acquire a dealership stalled 21 lakhs to the young man | Ather Energy ची डिलरशीप मिळवण्याचा प्रयत्न अंगलटी; तरुणाला तब्बल २१ लाखांना गंडा

Ather Energy ची डिलरशीप मिळवण्याचा प्रयत्न अंगलटी; तरुणाला तब्बल २१ लाखांना गंडा

googlenewsNext

पुणे : आय टी कंपनीत असलेल्या तरुणाने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवर व्यवसायाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातून डिलरशीप मिळविण्याचा प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती करणाऱ्या एथर एनर्जीची डिलरशीप देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी त्यांना तब्बल २१ लाख ३० हजार ५०० रुपयांचा गंडा घातला.

याबाबत मगरपट्टा येथे राहणाऱ्या एका ४३ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ ते २६ एप्रिल २०२३ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आय टी कंपनीत काम करत होते. नोकरी ऐवजी स्वत:चा व्यवसाय चालू करावा, असा त्यांच्या विचार होता. त्यातून त्यांनी इंटरनेटवर काही तरी व्यवसायाची माहिती घेत होते. त्यांनी फेब्रुवारीमध्ये एथर एनर्जी च्या वेबसाईटवर डिलरशीपसाठी अर्ज भरला. त्यांना एकाने कॉल करुन कंपनीने निवड केली असून तुम्हाला ई मेल केल्याचे सांगितले. त्यांनी ईमेलवरील फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी डिलरशीपसाठी पेमेंटचे शेड्युल कसे असणार याची माहिती दिली होती. त्यात रजिस्ट्रेशन फी, लायसन्स, सिक्युरिटी डिपॉझिट, स्टॉक, अॅग्रीमेंट असे सर्व मिळून ६२ लाख ७५ हजार ५०० रुपयांचे शेड्युल देण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी २६ एप्रिलपर्यंत एकूण २१ लाख ३० हजार ५०० रुपये पाठविले होते. त्यानंतर त्यांनी विमाननगर येथील एथर एनर्जी च्या स्कुटर शोरुमला भेट दिली. तेथून त्यांनी कंपनीच्या लिगल सेल्स एक्सझिक्युटीव्हशी संपर्क साधला असता, त्यांना आलेला ईमेल व त्यांनी ज्या बँक खात्यात पैसे पाठविले, ते कंपनीचे अधिकृत ईमेल व बँक खाते नसल्याचे समजले.त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक डगळे तपास करीत आहेत.

का झाली फसवणूक

* आय टी कंपनीत असतानाही आभासी संपर्कावर ठेवला विश्वास
* कंपनीशी थेट संपर्क न करताच केला व्यवहार
* अनेक डिलर शहरात असताना त्यांच्याशी केला नाही अगोदर संपर्क
* प्रत्यक्ष कंपनीला भेट न देता, खात्री न करता पाठविले पैसे
* आपल्या नावाशी साधम्य असलेल्या वेबसाईट इंटरनेटवर असल्याने लोकांशी फसवणूक होऊ शकते, याकडे कंपन्यांचे दुर्लक्ष
* अशा साधम्य असलेल्या वेबसाईट हटविण्यासाठी कंपन्या घेत नाही पुढाकार

Web Title: Aether Energy's attempt to acquire a dealership stalled 21 lakhs to the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.