बाधित नागरिकांना आधाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:22 AM2021-02-28T04:22:05+5:302021-02-28T04:22:05+5:30
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मागील काही महिन्यात आयुक्तांबरोबर याबाबतीत बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी मागील अनेक वर्षे भिजत ...
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मागील काही महिन्यात आयुक्तांबरोबर याबाबतीत बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी मागील अनेक वर्षे भिजत पडलेल्या या प्रकल्पास क्षेत्रीय कार्यालय स्तरावर गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरील भागात सोसायट्या व लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे अपुरा पडणारा डीपी रस्ता व विकास करण्यास हरकत नव्हतीच.
फक्त सोशल मीडियावर भाजपसह सर्वच पक्षच्या नेते मंडळींनी जे प्रदर्शन मांडले त्यामुळेच येथील बाधित नागरिकांच्या दुःखात भर पडली आहे. घर म्हटलेकी की नागरिकांच्या विशेषतः कुटुंबातील महिला वर्गाच्या भावनेचा व जिव्हाळ्याचा विषय असतो. येथील कारवाई सुरू असताना अडचण होईल किंवा म्हणून कोणीही नगरसेवक किंवा इतर पक्षाचे नेते मंडळींनी येथे येण्याची तसदी घेतली नाही. फक्त याच कॉलनीत राहणारा मनसेचा नितीन गायकवाड हाच काय तो प्रशासन व बाधित नागरिकांच्या मध्ये दुवा ठरत होता. इतर मंडळी तर आपल्यामुळेच रस्ता मार्गी लागतोय याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात मशगुल होते. त्यामुळे मोठ्या वर्गाला रस्त्याचा फायदा होत असला तरी अनेकांची कष्टाने कमाविलेले घर व त्यांचा जीव दोन्ही तुटत होते.
या कारवाईतही राजकारण झाले आहे. काही ठिकाणी चेहरे पाहून कारवाई झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केली आहे. तर यशस्वी कारवाई करून सुटकेचा निःश्वास टाकणारे उपायुक्त नितीन उदास, सहायक आयुक्त संदीप कदम, व अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप हे खमके अधिकारी देखील यावेळी अभिनंदनास पात्र आहेत.
चौकट:- रस्त्याच्या समोर येऊन दुकाने काढण्याची आस
आता ज्यांचे घर वाचले आहे व ते रस्त्याच्या कडेला आले आहेत ते सर्व येथे दुकाने किंवा व्यवसायिक वास्तू उभारण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच येथे शह कटशह करून कसेतरी रस्त्याच्या कडेला येण्याचा आटापिटा रंगला आहे. त्यामुळेच लोक एकमेकांच्या प्रकरणात देखील डोकं खुपसून राजकारण करताना दिसत आहेत. त्यामुळे आता तरी हे सर्व थांबवा नाही तर सागर कॉलनी च्या बाजूला सीमा भिंत घालून सर्वांचेच मनसुबे उधळून लावू असा इशारा येथे अधिकाऱ्यांनी दिला आहे
फोटो सागर:- कॉलनीत केलेली कारवाई