कोरोनामुळे घाबरले आहात, संवाद साधा : समुपदेशक वाढवतील तुमचे 'मनोबल'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:49 PM2020-03-27T13:49:48+5:302020-03-27T13:50:39+5:30

कोरोनाने घाबरवून टाकलंय? खूप एकटेपणा आलाय? बाहेर जायची सोय नाही? मनातलं सगळं बोलू कोणाशी? असे प्रश्न पाठ सोडत नसतील आता निराश, अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही. पुण्यातला समुपदेशकांचा गट तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार आहे.

Afraid of Corona, communicate: Counselors will boost your 'morale' | कोरोनामुळे घाबरले आहात, संवाद साधा : समुपदेशक वाढवतील तुमचे 'मनोबल'

कोरोनामुळे घाबरले आहात, संवाद साधा : समुपदेशक वाढवतील तुमचे 'मनोबल'

googlenewsNext

पुणे : कोरोनाने घाबरवून टाकलंय? खूप एकटेपणा आलाय? बाहेर जायची सोय नाही? मनातलं सगळं बोलू कोणाशी? असे प्रश्न पाठ सोडत नसतील आता निराश, अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही. पुण्यातला समुपदेशकांचा गट तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार आहे. तुम्ही त्यांना फोन करू शकता, मनातली भीती, शंका निःसंकोचपणे विचारू शकता. त्यांच्याशी बोलून तुमचं मन हलकं होईल, अशा विश्वास मनोबल सेवागटाच्या समुपदेशकांनी व्यक्त केला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे आपण सगळेच धास्तावलेलो आहोत. जगभरातून येणाऱ्या बातम्या आपल्यावर आदळत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडेही विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. याचे आपल्यावर शारीरिक परिणाम तर होत आहेच; पण मानसिक तणावातूनही आपण जात आहोत. हा ताण, सततची वाटणारी चिंता, भीती, अनिश्चितता अनेकांना अस्वस्थ करते आहे.  काहीजण कुटुंबापासून लांब असल्यामुळे किंवा ज्येष्ठ नागरिक घरात एकटे असल्यामुळे ते अधिक घाबरलेले आहेत.  अशा वेळी कोणाशी प्रत्यक्ष भेटता न येणे हे सुद्धा ताणाचे असू शकते. अशा वेळी लोकांना मनमोकळेपणाने बोलता यावे, यासाठी मनोबल समुपदेशक गटातर्फे काही संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या क्रमांकांवर फोन करून एकटेपणा आलेल्या व्यक्तींना बोलता येणार आहे. त्यांचे नावही गोपनीय राखले जाणार आहेत.

समुपदेशक गौरी जानवेकर यांनी 'लोकमत'ला सांगितले, 'सध्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य नीट राखणेही खूप महत्वाचे आहे. या काळात लोकांची भीती, निराशा, अस्वस्थता समजून घेणे खूप गरजेचे आहे. या अवघड काळात मन मोकळं करण्याची, आधाराची गरज वाटली तर नक्की फोन करा. 28 समुपदेशकांचा गट यासाठी कार्यरत आहे. तुम्ही पाच मिनिटे ते अर्धा तास फोनवर बोलू शकता. तुमचे नाव किंवा समस्या कुठेही उघड केली जाणार नाही. आमच्याकडून तुम्हाला नक्कीच चांगले मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल.'

सध्या कोरोनाबद्दल खूप उलटी सुलटी माहिती फिरत आहे. त्यामुळे आपल्याला नेमका कशाने संसर्ग होऊ शकतो आणि काय केल्याने त्यापासून सुरक्षित राहू असे विचारही त्रास देतात. कोरोनाबद्दलचे समज-गैरसमज, काय करावे आणि काय करू नये, याबाबतही विस्तृत माहिती दिली जात आहे. ही सेवा मोफत असून यासाठी कोणतेही शुल्क नाही. संवाद जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा होऊ शकतो. ही सेवा केवळ कोरोनाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या ताण निवारणासाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले

  • त्यासाठी दिलेल्या वेळेत खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 

सकाळी 10 ते रात्री  9 

मोहन निंबाळकर  – 97664 44469

सकाळी 10 ते दुपारी 12

स्मिता कुलकर्णी - 98227 52056

देवकी नवरेगावकर - 98906 27081

दीप्ती कुलकर्णी - 98817 18921

वंदना लोंढे  - 70575 5358

सकाळी 11 ते दुपारी 12 

मेघना राळे  - 93099 18275

डॉ रीना गौतम  - 77739 05282

दुपारी १२ ते  1

स्मिता कुलकर्णी  - 98227 52056

मेघना राळे  - 93099 18275

कल्याणी भाबड  - 98501 81598

मेघा पाटील  - 75880 11663

समृद्धी पानसे  - 99226 14922

दुपारी 1 ते 2

स्मिता कुलकर्णी  - 98227 52056

कल्याणी भाबड  - 98501 81598

मेघा पाटील  - 75880 11663

समृद्धी पानसे - 99226 14922

हर्षा नारखेडे  - 91687 60149

गौरी जानवेकर - 9881887590

दुपारी 2 ते  3

हर्षा नारखेडे  - 91687 60149

गौरी जानवेकर  - 9881887590

दुपारी 2 ते  4

स्मिता कुलकर्णी  - 98227 52056

कल्याणी भाबड  - 98501 81598

मनीषा मुळीक  - 86009 97240

भाग्यश्री जाधव  - 84464 01119

क्षिप्रा टुमणे  - 82752 03288

शीतल निंबाळकर  - 83088 99641

मृदुला केळकर  - 99230 01922

दुपारी 3 ते संध्याकाळी  5

मधुरा कोकीळ  - 99227 20114

दुपारी 4 ते 6

स्मिता कुलकर्णी  - 98227 52056

कल्याणी भाबड  - 98501 81598

स्वाती भुजबळ - 9130702552

पुष्पाजीत शिंदे - 96898 89814

जास्मिन मधाळे - 90671 81843

नीता आवटे - 98812 98774

संध्याकाळी 6 ते 8

साधना नातू  9146192704, 9890377533(whats App)

संध्याकाळी 7 ते 9

सायली भावे - 98233 56793

बिंदुमाधव खिरे  - 9763640480

रात्री 8 ते 9

मेघा पाटील - 75880 11663

सायली भावे  - 98233 56793

वैशाली वाहीकर  98811 39319

शुभांगी जोशी जाधव  - 97664 80413

नीलिमा किरणे- 98813 71910

Web Title: Afraid of Corona, communicate: Counselors will boost your 'morale'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.