AFINDEX 2023 | पुण्यात आफ्रिका-भारत संयुक्त लष्करी सराव; २३ राष्ट्रांच्या तुकड्या आणि प्रतिनिधी सहभागी

By नितीश गोवंडे | Published: March 21, 2023 05:59 PM2023-03-21T17:59:42+5:302023-03-21T18:04:24+5:30

औंध येथील परदेशी प्रशिक्षण विभागात हा सराव सुरू...

Africa-India Joint Military Exercise in Pune; Detachments and representatives from 23 nations participated | AFINDEX 2023 | पुण्यात आफ्रिका-भारत संयुक्त लष्करी सराव; २३ राष्ट्रांच्या तुकड्या आणि प्रतिनिधी सहभागी

AFINDEX 2023 | पुण्यात आफ्रिका-भारत संयुक्त लष्करी सराव; २३ राष्ट्रांच्या तुकड्या आणि प्रतिनिधी सहभागी

googlenewsNext

पुणे : भारत आणि आफ्रिका खंडातील २३ राष्ट्रांच्या दुसऱ्या संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण (फिल्ड ट्रेनिंग) (AFINDEX- 2023) सरावाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. औंध येथील परदेशी प्रशिक्षण विभागात हा सराव सुरू आहे.

या प्रशिक्षणात इथिओपिया, घाना, केनिया, लेसोथो, निजर, सेशेल्स, टांझानिया, युगांडा, झांबिया, बोत्सवाना, कॅमेरून, काँगो, इजिप्त, इस्वाटिनी/स्वाझीलंड, मलावी, नायजेरिया, रवांडा, सेनेगल, झिम्बाब्वे आणि मोरोक्को या राष्ट्रांच्या तुकड्या आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

हा संयुक्त सराव २००८ ला झालेल्या करारानुसार सुरू आहे. भारत-आफ्रिका शिखर परिषदेनंतर आफ्रिकेशी अधिकाधिक संपर्क कायम राखण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा भाग आहे. २०१९ नंतर तो यावर्षी आयोजित केला आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून भूसुरूंग निकामी करणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही या सरावाची संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कायम राखण्याच्या कार्यात कार्यक्षमता आणि सज्जता यांच्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सहभागी राष्ट्रांमधील लष्करी सहकार्य महत्त्वपूर्ण आहे.

उद्देश काय?

- शांतता आणि सुरक्षेत वाढ करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, नवनवीन कल्पना आणि अभिनव दृष्टिकोन यांची देवाणघेवाण करणे, सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या व्यवस्थापनाविषयी आफ्रिकेच्या अनुभवांचे अवलोकन करणे आणि या उपक्रमांमधून भारत-आफ्रिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

स्वदेशी उपकरणांवर भर

लष्करी सरावाची सुरुवात होण्याआधी डेझर्ट कोअरचे कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल राकेश कपूर यांनी मंगळवारी सकाळी उपस्थितांना संबोधित केले. हा सराव चार टप्प्यांत विभागला आहे. २८ ते ३० मार्च या कालावधीत लष्कर प्रमुखांची परिषद आयोजित केली आहे. या दरम्यान हे लष्कर प्रमुख संयुक्त सरावाची पाहणी करतील. यात स्वदेशी उपकरणांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जाईल.

Web Title: Africa-India Joint Military Exercise in Pune; Detachments and representatives from 23 nations participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.