१० महिन्यांनंतर कैद्यांची होऊ लागली नातेवाईकांशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:11 AM2021-02-11T04:11:06+5:302021-02-11T04:11:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जवळपास १० महिने कारागृहातील कैद्यांना त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना भेटता येत ...

After 10 months, the prisoners started visiting their relatives | १० महिन्यांनंतर कैद्यांची होऊ लागली नातेवाईकांशी भेट

१० महिन्यांनंतर कैद्यांची होऊ लागली नातेवाईकांशी भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जवळपास १० महिने कारागृहातील कैद्यांना त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना भेटता येत नव्हते. मोबाइल, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून या भेटीगाठी घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु, ते एका मर्यादेपर्यंतच शक्य होते. आता कारागृहातील कोरोना प्रादुर्भाव संपला असल्याने या भेटीगाठींचा येरवडा कारागृहात हळूहळू सुरुवात केली आहे.

राज्यातील सर्वाधिक कैद्यांची संख्या येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. येथे एकूण कैद्यांची क्षमता २ हजार ४४९ इतकी असताना सध्या तेथे एकूण ५ हजार ६३१ कैद्यांना ठेवले आहे. हे प्रमाण एकूण क्षमतेपेक्षा २३० टक्के जास्त आहे.

कोरोना काळात अनेक अधिकारी आणि कैद्यांनाही त्याची लागण झाली होती. येरवडा कारागृहातील सर्वाधिक ३२६ कैदी कोरानाबाधित झाले होते. ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यातूनच राज्यभरातील १० हजार ७७१ कैद्यांना पॅरोल, जामिनावर सोडण्यात आले होते.

याचवेळी कारागृहातील कैद्यांना नातेवाईकांशी भेट व्हावी, यासाठी मोबाइल फोन तसेच व्हिडीओ कॉलिंगमार्फत भेट घडवून आणण्यात येत होती. आता कैद्यांना प्रत्यक्ष भेटगाठ घेऊ देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. थंडीचा हंगाम सुरू झाल्याने आवश्यक स्वेटर, शाल अशा वस्तू नातेवाईकांकडून कैद्यांना पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

येरवडा कारागृहातील कैद्यांची संख्या

पुरुष स्त्री एकूण

कैद्यांची क्षमता २३२३ १२६ २४४९

दोषसिद्ध कैदी ७५४ २४ १०७९

न्यायाधीन कैदी ४४५५ १७७ ४६३२

स्थानबद्ध २३ ०० २३

----

एकूण ५३८९ २४२ ५६३१

येरवडा कारागृहातील कैद्यांची त्यांच्या नातेवाईकांशी भेटगाठ घडवून आणण्यात आता मर्यादित स्वरूपात १२ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. आवश्यक ते साहित्यही कैद्यांना पुरविण्यात येत आहे. सध्या साधारण २०० नातवाईकांना भेटण्याची संधी दिली जात आहे.

- यू. टी. पवार, कारागृह अधीक्षक, येरवडा

Web Title: After 10 months, the prisoners started visiting their relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.