SSC Result 2023: दहावीलाही कोकणच अव्वल; तर कोल्हापूर दुसरे, जाणून घ्या विभागनीय निकाल
By नम्रता फडणीस | Published: June 2, 2023 11:52 AM2023-06-02T11:52:06+5:302023-06-02T11:53:34+5:30
Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के लागला आहे
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023) मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेमध्ये कोकण विभागाचा निकाल ९८.११ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग अव्वल ठरला आहे. कोल्हापूरचा निकाल ९६.२२% असून, हा विभाग दुसऱ्या स्थानावर तर पुणे विभागाचा निकाल ९५.६४% इतका लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के लागला आहे.
राज्य मंडळाची इयत्ता दहावीची (Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023) परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीसाठी ६७ विषयात आणि आठ माध्यमात परीक्षा घेण्यात आली होती.
या विभागाचा निकाल सर्वाधिक
पुणे - ९५.६४%
मुंबई - ९३.६६%
कोकण - ९८.११%
औरंगाबाद - ९३.२३%
अमरावती - ९३.२२%
लातूर - ९२.६७%
नागपूर - ९२.०५%
कोल्हापूर - ९६.२२%
मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण : ९५.८७%
मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण :९२.०५%