चौदा महिन्यांनतंर पुणे स्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:15+5:302021-06-29T04:09:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलप्मेंट कॉर्पोरेशनने (आयआरएसडीसी) पुणे रेल्वे स्थानकावरच्या फलाटाचे तिकीट प्रुपये केले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलप्मेंट कॉर्पोरेशनने (आयआरएसडीसी) पुणे रेल्वे स्थानकावरच्या फलाटाचे तिकीट प्रुपये केले होते. आता पुन्हा ते १० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याने नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाने स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी फलाट तिकीट दर ५० रुपये केले होते.
रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही रेल्वे स्थानकाचे फलाट तिकीट पुन्हा १० रुपये केले. मात्र, पुणे स्थानकावरील फलाट तिकीट पन्नास रुपये ठेवल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर प्रशासनाने प्रवाशांची मागणी मान्य करून तिकीट दर पुन्हा १० रुपये केले आहे.
१४ महिन्यांनंतर पुणे स्थानकावरचा तिकीट दर १० रुपये होत आहे. या १४ महिन्यांत रेल्वे विभागाला सुमारे
९४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.