तब्बल १८ वर्षांनंतर झाली बापलेकीची भेट, सोशल मीडियामुळे सापडणे झाले शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:36 AM2018-03-19T00:36:32+5:302018-03-19T00:36:32+5:30
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियामुळे सामाजिक धोके निर्माण होत असले तरी त्याचा योग्य वापर केल्यास काही चांगलेदेखील घडून येऊ शकते, याची प्रचिती या घटनेमुळे आली.
रावणगाव : फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियामुळे सामाजिक धोके निर्माण होत असले तरी त्याचा योग्य वापर केल्यास काही चांगलेदेखील घडून येऊ शकते, याची प्रचिती या घटनेमुळे आली.
तब्बल १८ वर्षांपूर्वी घरदार सोडून गेलेल्या गृहस्थास व्हॉट्सअॅपमुळे पुन्हा घरवापसी करणे शक्य झाले. यासाठी काही जागरूक तरुणांनी पुढाकार घेतला. बारामती तालुक्यातील सावळ गावातील संपत विठ्ठल आटोळे (वय ६०) हे गृहस्थ सन २००० साली आपल्याकडून झालेल्या थोड्याशा चुकीमुळे शेजारच्या शेतकऱ्याचा ऊस जळाल्याने त्यांच्यापासूनआपल्याला त्रास होईल, या भीतीने तसेच घरगुती वादविवादामुळे मानसिक संतुलन ढासळल्याने ते घराबाहेर पडले.
घर सोडल्यानंतर मिळेल त्या ठिकाणी आणि मिळेल ते काम करत वेगवेगळ्या गावांमध्ये संपत आटोळे हे फिरत राहिले. त्याच दरम्यान जाधव आणि बिरादार यांनी (सावळ, ता. बारामती) येथील भारतीय जनता पार्टीचे बारामती तालुका अध्यक्ष प्रवीण आटोळे यांच्याशी संपर्क केला. तुमच्या गावातून संपत आटोळे नावाचा कोण माणूस घरातून निघून गेला आहे का, याची चौकशी त्यांना करावयास त्यांना सांगितले. दरम्यान प्रवीण आटोळे यांनी प्रथमदर्शनी चौकशी केल्यावर त्यांच्या काहीच लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सअॅपवर त्या व्यक्तीचा फोटो पाठविण्यास सांगितले आणि मग जाधव आणि बिरादार यांनी संपत यांचा फोटो प्रवीण आटोळे यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविल्यानंतर तो फोटो गावातील काही वृद्ध लोकांना दाखविला असता हे तर आपल्याच गावातील संपत विठ्ठल आटोळे आहेत.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधील जानापूर या गावात गेले. त्याच गावात (भिगवण, ता. इंदापूर) येथील जेसीबी व्यावसायिक मोहन जाधव हे आपल्या कामानिमित्त जानापूरात गेले असता तेथील मित्राला भेटावयास गेले होते. तेव्हा त्यांना मित्राच्या घराशेजारीच एक गृहस्थ अत्यंत केविलवाण्या अवस्थेत बसलेले दिसले. त्यांचा चेहरा आणि पोशाख पाहून जाधव यांना त्यांची दया आल्याने त्यांनी या गृहस्थाची विचारपूस केली असता ते फक्त संपत आटोळे एवढेच नाव सांगून गप्प बसले. त्यानंतर जाधव आणि त्यांचे जानापूरचे मित्र कल्याण बिरादार यांनी आटोळे आडनावाचे लोक कोठे कोठे राहतात. याचा शोध घेणे सुरू केले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांना संपर्क केला.त्यानंतर त्यांची पत्नी आणि इतर नातेवाईकांनी दोन-तीन वर्षे शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, ते न सापडल्याने घरातील
मंडळींनी त्यांची घरी पुन्हा माघारी येण्याची आशा सोडूनच दिली होती.मग शिवाजी आटोळे यांनी संपत आटोळे यांच्या (रावणगाव ता. दौंड) येथील जावयाचे मोठे बंधू अशोक गावडे यांच्याशी संपर्क साधला. अशोक गावडे आणि शिवाजी आटोळे हे जानपूर या गावी संपत यांना आणावयास गेले. त्यांनी आपला पुतण्या शिवाजी आटोळे यांना पाहताच संपत यांनी त्यांना मिठी मारली.आणि जोरजोरात रडू लागले. त्यानंतर संपत आटोळे रावणगाव येथील त्यांच्या मुलीकडे आणले असता आपल्या वडिलांना पाहताच मुलीचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण एका मुलीला आपले घरातून निघून गेलेले वडील तब्बल १८ वर्षांनी आपल्याला भेटताहेत यावर काही क्षण तिचा विश्वासच बसत नव्हता.