२० वर्षे वादात अडकलेला रस्ता अखेर खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:10 AM2021-07-31T04:10:19+5:302021-07-31T04:10:19+5:30
दावडी : दावडी पिंपळगाव रस्ता ते आमराळे, गावडे, शिंदे वस्तीचा रस्ता २० वर्षांपासून वादात अडकला होता. दावडी ...
दावडी : दावडी पिंपळगाव रस्ता ते आमराळे, गावडे, शिंदे वस्तीचा रस्ता २० वर्षांपासून वादात अडकला होता. दावडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व शेतकऱ्यांच्या सहकार्याने रस्ता खुला करण्यात आला आहे. खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमार यांच्या हस्ते रस्ता खुला करण्यात आला.
आमराळे, गावडे, शिंदे या तीन दावडी गावातील वस्त्या व शेजारील पिंळळगाव मधील दौंडकरवाडी असा ह्या मधील शिवरस्ता होता. या रस्त्यावरून जाणाऱ्यांची लोकसंख्या जवळपास १२०० आहे. शेतमालवाहतुकीसाठी अडचण निर्माण होत होती. शेतकऱ्यांचे शेती माल, खराब होऊन जात असत. आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी वाहन जात नसल्यामुळे नागरिकांची फरफट होत होती. त्यामुळे खूप हाल होऊ लागले होते. हा वाद शेवटी खेड तहसीलदारमध्ये गेला होता. या रस्त्याची पाहणी तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केली होती. पण हा वाद मिटवण्यासाठी पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, उद्योजक सचिन नवले, उपसरपंच राहुल कदम, हिरामण खेसे यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रस्त्याच्या वाद मिटवला.यावेळी शेतकऱ्यांनी आनंद वक्त केला आहे. यावेळी, ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते, अनिल नेटके, ग्रामपंचायतीच्या सदस्या राणी डुंबरे पाटील, पुष्पा होरे, धनश्री कान्हूरकर, मंडल अधिकारी विजय घुगे, राजाराम दिघे, संदीप दिघे, साहेबराव दिघे, नारायण दिघे, सोपान दिघे, बाबासोा दिघे, गोरक्ष दिघे, प्रभू दिघे, रोहिदास आमराळे, बाळासोा आमराळे, भानुदास आमराळे, नवनाथ आमराळे, भाऊसाहेब गावडे, नाना गावडे, माणिक गावडे, सोपान शिंदे, बाबू दिघे, काळूराम शिंदे, जिजाभाऊ आमराळे, रामदास आमराळे, अनिकेत आमराळे, अक्षय शिंदे उपस्थित होते.
आमराळेवस्ती ते गावडेवस्ती हा रस्ता शेतकऱ्यांची बैठक घेऊन हा वाद कायमस्वरूपी मिटवण्यात आला.