सासवडला २०० वर्षांनंतर रंगले बगाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 02:53 AM2018-04-02T02:53:56+5:302018-04-02T02:53:56+5:30

सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या चैत्री उत्सवाला रविवार पासून सुरवात झाली. गेल्या २०० वर्षांपासून बंद असलेली बगाडाची परंपरा या वर्षापासून पुन्हा सुरु झाली आहे. त्याची नवलाई पाहण्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गावचे ज्ञानेश्वर जगताप तथा माऊली यांना या बगाडावर बसण्याचा पहिला मान मिळाला.

 After 200 years, Saswad got thrashed | सासवडला २०० वर्षांनंतर रंगले बगाड

सासवडला २०० वर्षांनंतर रंगले बगाड

googlenewsNext

जेजुरी - सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या चैत्री उत्सवाला रविवार पासून सुरवात झाली. गेल्या २०० वर्षांपासून बंद असलेली बगाडाची परंपरा या वर्षापासून पुन्हा सुरु झाली आहे. त्याची नवलाई पाहण्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गावचे ज्ञानेश्वर जगताप तथा माऊली यांना या बगाडावर बसण्याचा पहिला मान मिळाला.
चैत्र वद्य प्रतिपदा यात्रेचा पहिला दिवस असल्याने पहाटे उत्सव मूर्तींना पंचामृत स्नान व महापूजा करण्यात आली. सकाळी ११ वाजता बगाडाचे वाद्यांच्या गजरात पूजन झाले. त्यानंतर माउली जगताप यांना बगाडावर बसवण्यात आल्यावर गावक-यांनी आणि यात्रा कमिटीच्या प्रमुखांनी दोर हातात धरून हलगी, ताशा, तुतारीच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण केली. भैरवनाथांचा जयघोष करत बगाडाच्या पाच फे-या पूर्ण केल्या. त्यानंतर मानाचा ध्वज कळस ते बगाड असा बांधण्यात आला. महाआरती होऊन हा सोहळा पार पडल्यावर महिला भाविकांनी बगाडस्थळाची पूजा आणि दर्शनाला गर्दी केली. उत्सव मूर्तींना त्रिकाळ स्नान व पूजा करण्यात आली. सायंकाळी पालखीतून ग्राम प्रदक्षणा व मध्यरात्रपर्यंत छबिन्याचा कार्यक्रम मंदिरासमोर संपन्न झाला.

Web Title:  After 200 years, Saswad got thrashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.