फक्त 2019 नंतर पवारांचं घर फुटू नये, भाजपा नेते राम शिंदे यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:13 PM2019-04-19T18:13:25+5:302019-04-19T18:15:02+5:30
पूर्वीच्या काळात वडिलांचं पाप मुलांना फेडावं लागत असे.आता हे कलियुग आहे.आता केलेलं पाप याच जन्मात फेडावं लागतं. त्यामुळे 2019च्या निवडणुकीनंतर पवारांचं घर फुटू नये असे विधान राज्यमंत्री राम शिंदे यांनी बारामतीत केलं.
पुणे : पूर्वीच्या काळात वडिलांचं पाप मुलांना फेडावं लागत असे.आता हे कलियुग आहे.आता केलेलं पाप याच जन्मात फेडावं लागतं. त्यामुळे 2019च्या निवडणुकीनंतर पवारांचं घर फुटू नये असे विधान राज्यमंत्री राम शिंदे यांनी बारामतीत केलं.
युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, रासपचे महादेव जानकर,आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, खासदार संजय काकडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, पवार कुटुंबाने आजपर्यंत अनेक घरांमध्ये भांडणे लावली.त्यामुळे आता त्यांच्या घरात या निवडणुकीनंतर भांडणे लागू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.