३०० रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 04:53 PM2018-02-06T16:53:26+5:302018-02-06T16:54:31+5:30

शिवाजीनगर न्यायालयातील कनिष्ठ लिपिसास ३०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

After accepting a bribe of 300 rupees, the Shivaji Nagar court's clerk caught by ACB | ३०० रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात

३०० रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देतक्रारदार शिवाजीनगर न्यायालयात आहेत वकीलतक्रारदाराकडे ५०० रुपयांची मागणी करून ३०० रुपयांवर तडजोड

पुणे : शिवाजीनगर न्यायालयातील कनिष्ठ लिपिसास ३०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तक्रारदार शिवाजीनगर न्यायालयात वकील आहेत. न्यायालयातील कोर्ट क्र. २९ मधील कनिष्ठ लिपीक पालवे याने तक्रारदार यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. या वेळी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची ६ फेब्रुवारी रोजी पडताळणी केली असता कनिष्ठ लिपीक शरद पालवे याने तक्रारदाराकडे ५०० रुपयांची मागणी करून ३०० रुपयांवर तडजोड झाली. आज (दि. ६) सापळा रचून ३०० रुपये स्वीकारताना त्यास ताब्यात घेण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Web Title: After accepting a bribe of 300 rupees, the Shivaji Nagar court's clerk caught by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे