अतिक्रमण कारवाईनंतरही परिस्थिती जैैसे थे! नगर परिषदेचा वाहतूक आराखडाही कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:27 AM2017-11-28T03:27:43+5:302017-11-28T03:27:54+5:30

पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे.

 After the action of encroachment, the situation was like that! The traffic plan of the city council is also on paper | अतिक्रमण कारवाईनंतरही परिस्थिती जैैसे थे! नगर परिषदेचा वाहतूक आराखडाही कागदावरच

अतिक्रमण कारवाईनंतरही परिस्थिती जैैसे थे! नगर परिषदेचा वाहतूक आराखडाही कागदावरच

Next

- राजेंद्र मांजरे
राजगुरुनगर : पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे. वाडा रोड भाजीमंडईलगत, पाबळ रोड येथे पुन्हा अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूककोंडीत अजूनच भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
राजगुरुनगर शहरामध्ये मागील महिन्यात पुणे-नाशिक महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाडा रोड, पाबळ
रोड येथील अनधिकृत बांधकाम,
शेड टपºया, हातगाड्या यांच्यावर सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय आधिकारी आयुष
प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली
नगर परिषद, राष्ट्रीय राज्यमार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत कारवाई करण्यात
आली होती. त्यात हातगाड्यांसह, टपºया व अन्य साहित्य जप्त
करण्यात आले. या कारवानंतर व्यावसायिकांना नगर परिषद हद्दीमध्ये पुन्हा जागा देण्यात आली. त्यांचे पर्यायी जागा देऊन पुनवर्सन करून हातगाड्या लावण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच राजगुरुनगर परिषद हद्दीमध्ये नगर परिषदेने टेंडर काढून वाहतूक आराखडाबाबत नियोजन केले होते. मात्र या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे.

चालताही येत नाही : विक्रेत्यांनी दुकाने थाटली

शहरातील एकेरी वाहतूक, वाहनतळ, वाहनबंदी (नो पार्किंग), झेब्रा क्रॉसिंग याबाबत शहरात ठिकठिकाणी केलेले नियोजन कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. अतिक्रमण कारवाईनुसार त्या ठिकाणी टपरीधारक, फळविक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण करू नये; असे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र पाबळ रोड येथे खासगी वाहनांचा वाहनतळ बनला आहे. त्यामुळे पादचाºयांना नीट चालताही येत नाही. तसेच वाडा रोड भाजीमंडईलगत रस्त्यावर भाजीविक्रेते रस्त्यावरच बसत असल्याने अजूनच वाहतूककोंडी होत आहे. महात्मा गांधी विद्यालयासमोर फळविक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली आहेत. या रस्त्यावरून विद्यार्थी, नागरिक यांना येथून जाताना विनाकारण त्रास होतो.

काही ठिकाणी अनधिकृत टपºया व भाजीविक्रेते, फळ विक्रेत्यांनी रस्ते व पदपथांवर ठाण मांडलेले आहे. त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे अतिक्रमण अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. किंबहुना त्यांच्याच आशीर्वादाने अतिक्रमणधारकांची मुजोरी कारवाईअभावी दिवसेंदिवस वाढत आहे अशी परिस्थिती आहे.

कायदेशीर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी नगर प्रशासनाचीच आहे. अतिक्रमणे पूर्वीप्रमाणेच होत असतील तर इतर ठिकाणच्या अतिक्रमणांना चाप बसण्याचे दूरच, एकच महिन्यात पुन्हा सर्वत्र अतिक्रमणे वाढू लागल्याने त्याचा विपरीत परिणाम पादचारी, वाहनधारक सर्वांनाच होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत नगर परिषद मुख्य अधिकारी संर्पक साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

माझी आता नव्यानेच नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबत माहिती घेऊन पुढील दोन दिवसांत बैठक घेऊन योग्य ती कारवाई करणार आहे. शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी व नागरिकांच्या हितासाठी शहरातील पुन्हा होत अतिक्रमणे काढण्यात येतील.
-शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष राजगुरुनगर नगर परिषद

पुन्हा अतिक्रमण होत असल्यास त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल. त्यासाठी नगरपरिषद मध्ये अतिक्रमण विरोधी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांनी पुन्हा झालेले अतिक्रम हटवावे. तसेच मी उद्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून माहिती घेतो.
-आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी खेड विभाग

अतिक्रमणे हटवली परंतु यामुळे होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या अजुनही सुटलेली नाही. फक्त जे हातावर पोट भरत होते,त्या सगळ्यांचे नुकसान झाले. मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. अतिक्रमण धारांचे पुनवर्सन करावे.
- दीपक थिगळे (नागरिक )

Web Title:  After the action of encroachment, the situation was like that! The traffic plan of the city council is also on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे