आंदोलनानंतर अधिकाऱ्यांची सणसर परिसरात पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:36+5:302020-12-23T04:09:36+5:30
लोकमत न्यूज नेटवकर्क सणसर : नीरा-भीमा जलस्स्थिरीकरण योजनेच्या बोगद्यामुळे सपकळवस्ती येथील घरांना तडे गेले. विहिरी आटल्यामुळे ग्रामस्स्थांनी या प्रकल्पाचे ...
लोकमत न्यूज नेटवकर्क
सणसर : नीरा-भीमा जलस्स्थिरीकरण योजनेच्या बोगद्यामुळे सपकळवस्ती येथील घरांना तडे गेले. विहिरी आटल्यामुळे ग्रामस्स्थांनी या प्रकल्पाचे काम दोन दिवसांपासून बंद पाडले. अखेर जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी परिसराला भेट देत पाहणी केली.
इंदापूर येथील नदीजोड प्रकल्पाच्या अंतर्गत निरा-भिमा जलस्थिरिकरण प्रकल्पाचे काम सणसर येथे सुरू होते. ते काम सपकळवाडी येथील सर्व शेतकरी, महिला यांच्यासह नीरा-भीमा जल स्थिरीकरण बोगद्यावर जाऊन बंद पाडले होते. या योजनेमुले घरांना तडे गेले आहेत तसेच जमिनीतील पाण्याचा स्थर खालावला आहे. अनेक वीहीरींचे पाणी आटले आहे. त्यामुळे आम्हाला या प्रकल्पाचे बाधित असल्याने प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले मिळावेत, तसेच विहिरींच्या गेलेल्या पाण्याच्या बदल्यात आम्हाला निरा डाव्या कालव्यातून पाणी द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी करत हे काम बंद केले. त्यामुळे जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी, ग्रामस्थांच्या मागण्या समजून घेऊन मंगळवारी प्रत्यक्ष येथील शेतकऱ्यांच्या घरांना गेलेले तडे तसेच विहिरींचे कमी झालेले व आटलेले पाणी बोरवेल चे पाणी याची प्रत्यक्ष पाहणी भुवैज्ञानिकांच्या मार्फत करण्यात आली.
यावेळी उपकार्यकारी अभियंता राहुल घनवट घनवट वरिष्ठ भूवैज्ञानिक अतुल धवणे, सचिन सपकळ, उमेश सपकळ, जगदीश सपकळ, शिवाजी सपकळ, आप्पा सपकळ यांच्यासह सर्व शेतकरी उपस्थित होते.
कोट
शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दहा दिवसात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असेल. - तुषार सपकळ ,युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी इंदापूर तालुका
कोट
शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणच्या तक्रारी होत्या तेथील विहिरींचे ,बोरवेलचे व घरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले आहे. भौगोलिक परिस्थिती प्रमाणे या कामाच्या भूसुरुंगमुळे किती अंतरापर्यंत विहीरींचे पाणी जाऊ शकते त्याचा अहवाल जलसंपदा खात्यास देण्यात येईल.
- अतुल धवणे, वरिष्ठ भूवैज्ञानिक नाशिक
फोटो ओळ 1)जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी विहिरींची केलेली पाहणी 2) कोरडी पडलेली विहीर 3) अधिकारी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करत असताना