पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद, हैदराबादनंतर आता पुण्यातील 'सिरम' इन्स्टिटयूटमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 05:12 PM2020-11-28T17:12:14+5:302020-11-28T17:47:40+5:30
कोरोनावरील लसीची निर्मिती करत असलेल्या 'सिरम'कडे सध्या जगाचं लक्ष लागून आहे...
पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला पोहोचले आहेत. सकाळी 12:30 ला हा दौरा आयोजिला होता मात्र भारतामध्ये अहमदाबाद इथल्या झायडस बायोटेक पार्क, हैदराबाद इथल्या भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट असा हा आजचा एकूण दौरा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सायंकाळी 4:45 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे. 'सिरम'कडे सध्या जगाचं लक्ष लागून आहे. कारण लस उत्पादनाची जगातील सर्वात मोठी क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीचं उत्पादन करण्याचे हक्क सीरम इन्स्टिट्यूटनं मिळवले आहेत. या लसीच्या चाचण्यांचे विविध टप्पे जाणून घेण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दौरा करत आहेत. खूप कमी वेळेसाठी म्हणजेच तासाभराचा हा दौरा आहे.
ही कोरोनाची लस लोकांपर्यंत कधीपर्यंत पोहोचू शकते आणि कोणत्या माध्यमातून पोहोचू शकते हे कदाचित या दौऱ्यानंतर स्पष्ट होऊ शकेल. कारण ही
कोरोना लस कुणाला मोफत उपलब्ध होईल का? किती कालावधीत ही लस उत्पादित होईल? किती प्रमाणात उत्पादित होईल? याची उत्तरं कदाचित पंतप्रधानांच्या या सीरम इन्स्टिट्यूटच्या दौऱ्यानंतर मिळू शकतील. या दौऱ्यानंतर पंतप्रधान थेट दिल्लीला जाणार आहे.
सध्या कोरोनाची यशस्वी लस उत्पादित होणं जगासाठी सगळ्यात प्राथमिक बाब होऊन बसली आहे आणि जर सीरममध्ये या लसीचं उत्पादन योग्य पद्धतीने आणि देशाच्या गरजेच्या दृष्टीने झालं तर पुण्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असेल. आणखी महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची लस आता शेवटच्या टप्प्याला याला आहे. तेव्हा ही लस स्टोअर करण्याच्या दृष्टीने उभे करावे लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सीरमशी सरकारला लस वितरणाच्या दृष्टीने करावा लागणारा खर्च याविषयीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊ शकतात.
जगभराचं कोरोना लस उत्पादन सीरम मध्ये होऊ शकतं. त्यामुळेही पुण्यातलं सीरम इन्स्टिट्यूट आणि आजचा पंतप्रधान यांचा सीरम दौरा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.