अखेर ३ लाख १२ हजार दुबार मतदार यादीतून कमी

By Admin | Published: September 23, 2015 03:06 AM2015-09-23T03:06:43+5:302015-09-23T03:06:43+5:30

जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटीस देऊन देखील लाखो मतदारांनी आपले दुबार नाव, मयत झालेल्या व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केले नाहीत.

After all, less than 3 lakhs 12 thousand double voters list | अखेर ३ लाख १२ हजार दुबार मतदार यादीतून कमी

अखेर ३ लाख १२ हजार दुबार मतदार यादीतून कमी

googlenewsNext

पुणे : जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटीस देऊन देखील लाखो मतदारांनी आपले दुबार नाव, मयत झालेल्या व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केले नाहीत. यामुळे दुबार मतदारांवर कडक कारवाई करुन अशी नावे त्वरीत डिलिट करणयाचे आदेश केंद्रीय निवडणुक आयोगान जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानुसार येत्या दोन दरम्यान जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार दुबार, मयत मतदारांची नावे यादीतून डिलिट करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
जिल्हा निवडणूक कार्यालयांच्या वतीने जिल्ह्यातील मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. अशा मतदारांची यादी सर्व विधानसभा मतदार संघात संबंधित मतदार नोंदणी अधिका-यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांना नोटीसा पाठवून त्यांना नक्की कोणत्या मतदार संघात नाव कायम ठेवायचे याची विचारणा केली आहे. एकाच व्यक्तींचे दोन मतदार संघात नाव असणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे या नोटीसीला उत्तर न देणा-या मतदारांवर कारवाई करुन त्यांची नावे अखेर डिलिट करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघात ८ हजार ९४७ मतदार स्थलांतरीत, १२ हजार ८४५ मतदार मयत आणि तब्बल ४ लाख ६४ हजार २३८ मतदार दुबार आहेत. या मतदारांमुळे जिल्ह्याची मतदार यादी मोठ्या प्रमाणात फुगली आहे. त्यामुळे आता ही नावे कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात आता पर्यंत सुमारे ३ लाख १२ हजार नावे यादीतून डिलिट करण्यात आली असल्याचे राव यांनी सांगितले.यामध्ये सर्वांधिक ८१ हजार चिंचवड विधानसभा मतदार संघ, ४२ हजार भोसरी आणि ३७ हजार मतदार खडकवासला मतदार संघातील आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: After all, less than 3 lakhs 12 thousand double voters list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.