नारायण राणे यांच्या अटकेनंतर चौफुला येथे शिवसैनिकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:58+5:302021-08-25T04:15:58+5:30

या वेळी यवत पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या ...

After the arrest of Narayan Rane, Shiv Sainiks celebrated at Chaufula | नारायण राणे यांच्या अटकेनंतर चौफुला येथे शिवसैनिकांचा जल्लोष

नारायण राणे यांच्या अटकेनंतर चौफुला येथे शिवसैनिकांचा जल्लोष

Next

या वेळी यवत पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. तसेच नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर म्हणाले की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंत्रिपद केवळ ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर टीका करण्यासाठीच देण्यात आले आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना ज्ञात आहे.

यावेळी शिवसेना दौंड तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, तालुका समन्वयक देविदास धुमाळ, शिवसेना वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. दत्तात्रय पाचपुते, ॲड नानासाहेब साखरे, शिव सहकार सेना तालुकाप्रमुख माऊली आहेर, युवासेना जिल्हा समन्वयक निलेश मेमाने, युवा सेना तालुका अधिकारी समीर भोईटे, युवा सेना उपजिल्हा युवा अधिकारी योगेश फडके, उपतालुका युवा अधिकारी शुभम माळवे, उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, नवनाथ जगताप, रमाकांत निवंगुणे, सदानंद लकडे, अमोल काळे, शिवसेना विभाग प्रमुख हनुमंत निगडे, काका परदेशी, बाळासो होले, नामदेव दोरगे, डॉ. फडतरे, रोहन दळवी, चंद्रकांत भणभणे,उपविभाग प्रमुख शिवाजी साळुंके, रामदास काळभोर, पांडुरंग काळभोर, राहुल फडके, शाखाप्रमुख अशोक दोरगे, आबासाहेब देवकाते, अर्जुन कडू व शिवसेनेचे श्रीपती दोरगे, मोहन चोरमले, शंकर शितोळे, शिवाजी शितोळे व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: After the arrest of Narayan Rane, Shiv Sainiks celebrated at Chaufula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.