पोलिसांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:37 PM2018-12-16T23:37:37+5:302018-12-16T23:38:08+5:30

निवेदन दिले : आंदोलकांचे अटकसत्र त्वरित थांबविण्याची मागणी

After the assurances of the police, the fasting of the Maratha Kranti Morcha is back | पोलिसांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण मागे

पोलिसांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण मागे

googlenewsNext

चाकण : महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेल्या निरपराध तरुणांवरील गुन्हे विनाशर्त मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी जाहीर केलेले आमरण उपोषण पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.

कोरेगाव भीमा दंगलीच्या धर्तीवर समिती स्थापन करावी व इतर काही मागण्यांचे निवेदन चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना देण्यात आले. त्यानंतर उपोषण स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, मनोहर वाडेकर, माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक मांडेकर, कालिदास वाडेकर, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, भगवान मेदनकर, बाबा राक्षे, अंकुश राक्षे, शंकर राक्षे, प्रीतम परदेशी, राहुल नायकवाडी, गणेश पºहाड, अतिष मांजरे, नीलेश पानसरे, बाबाजी कौटकर, गणेश मांडेकर, विजय खाडे, रत्नेश वैरागे यांच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन दिले. निवेदनात मराठा आंदोलकांचे अटकसत्र त्वरित थांबविण्यात यावे. तसेच शासन, मराठा समन्वयक व पत्रकार यांची समिती स्थापन करण्यात यावी असे म्हटले आहे.
दंगलीमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे अशा लोकांना ताब्यात घ्या, मात्र ज्यांचा या आंदोलनात काही सहभाग नाही, त्यांना तपासाकरिता ताब्यात घेऊन गंभीर गुन्हे दाखल करीत आहेत. ही कारवाई करताना त्यांच्या नातेवाइकांना किंवा मराठा समन्वय समितीला विश्वासात घेत नाही त्यामुळे समाजात अकारण तेढ निर्माण होत आहे. संबंधित व्यक्तींना सीसीटीव्ही फुटेज दाखवावे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर यांनी या वेळी सांगितले.
निवेदन स्वीकारल्यानंतर चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार म्हणाले की, समिती स्थापन करण्याचा सर्वस्वी निर्णय हा वरिष्ठ अधिकारी घेतील. तपासामध्ये अडथळे निर्माण होऊ नये म्हणून सीसीटीव्ही फुटेज दाखवता येणार नाही; मात्र तुमच्या मागण्यांचे निवेदन हे वरिष्ठ कार्यालयात पाठवून
देणार आहे.

शहराला छावणीचे स्वरूप
उपोषण आंदोलनानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परिणामी पोलिसांना निवेदन देताना चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे चाकण शहराला छावणीचे स्वरूप आले होते.

Web Title: After the assurances of the police, the fasting of the Maratha Kranti Morcha is back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.