पाठलाग करून चोरटे केले जेरबंद

By admin | Published: September 27, 2016 04:27 AM2016-09-27T04:27:37+5:302016-09-27T04:27:37+5:30

शहरातील स्थानिक चोरट्यांना हाताशी धरून ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या वसईतील संशयित चोरट्यास पिंपरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. वाकड पोलीस ठाण्याच्या

After being chased by robberies | पाठलाग करून चोरटे केले जेरबंद

पाठलाग करून चोरटे केले जेरबंद

Next

पिंपरी : शहरातील स्थानिक चोरट्यांना हाताशी धरून ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या वसईतील संशयित चोरट्यास पिंपरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या करणाऱ्या दोन आरोपींना वाकड पोलिसांच्या स्वाधीन केले. पिंपरी पोलिसांच्या पथकाने वसईतील वाकी फाटा, नायगाव येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. १४ तोळे सोन्याचे दागिने, दूरचित्रवाणी संच, लॅपटॉप, होम थिएटर, दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी मोटार असा एकुण ९ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
संशयित आरोपी राहुल उर्फ शेंड्या सीताराम थोरात (वय २४, वाकी फाटा, नायगाव, वसई) याच्यासह त्याचा साथीदार रणवीरसिंह बलबीरसिंह सहोता (वय २५, भोसरी), अक्षय बाळू सोनवणे (वय २०, रत्नदीप सोसायटी, निगडी) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. राहुल उर्फ शेंड्या थोरात याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.
आरोपींकडून १४ तोळे सोन्याचे दागिने, दूरचित्रवाणी संच, लॅपटॉप, होम थिएटर, दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी मोटार असा एकूण ९ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. घराचे पत्रे उचकटून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना फिल्मी स्टाइलने पोलिसांनी पाठलाग करून पकडले. वाकड, पिंपरी आणि परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली या चोरट्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

घरफोड्या करणारी चार अल्पवयीन मुले भोसरी पोलिसांना आढळून आली. सोमवारी सकाळी भोसरी परिसरातून त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील सुमारे १ लाख २९ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी भोसरी परिसरातून १३ ते १५ वयोगटातील चार अल्पवयीन मुले पोलिसांना ताब्यात घेतली. ही कारवाई परिमंडल तीनचे उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या पथकाने केली.

Web Title: After being chased by robberies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.