दुचाकीची तोडफोड केल्यावर घरात शिरून केली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:09 AM2021-06-23T04:09:14+5:302021-06-23T04:09:14+5:30
पुणे : घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीची तोडफोड केलेल्या अल्पवयीन मुलाला पकडण्यासाठी घरातील लोक पाठीमागे गेले असताना चोरट्यांनी घरात शिरून ...
पुणे : घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीची तोडफोड केलेल्या अल्पवयीन मुलाला पकडण्यासाठी घरातील लोक पाठीमागे गेले असताना चोरट्यांनी घरात शिरून १० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी तिघांंना अटक केली आहे. अनुुज प्रवीण गायकवाड (वय १९), तेजस गायकवाड, बाबाजी बावधने (वय २०, तिघे रा. वीरभगतसिंग वसाहत, औंध रोड) अशी अटक केलेल्यांची नावे असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी शोकावत भोसले (वय २९, रा. पड्याळ वस्ती, औंध रोड) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली. भोसले यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकी लावली होती. अल्पवयीन मुलगा व इतर आरोपींनी २० जूनच्या मध्यरात्री त्यांच्या दुचाकीची हेडलाईट फोडून तिची तोडफोड केली. भोसले यांच्या हे लक्षात आल्यावर ते व पत्नी मुलाला पकडण्यासाठी घरातून बाहेर पडून त्याच्या पाठीमागे गेले. हे पाहून इतर आरोपी भोसले यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्याने आत शिरले. भोसले यांच्या पत्नीने पर्समध्ये ठेवलेली १० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. भोसले यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी अधिक तपास करीत आहेत.