मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:59 IST2025-01-24T11:58:14+5:302025-01-24T11:59:02+5:30
माजी खासदार किसनराव बाणखेले यांचे विकास हे धाकटे चिरंजीव होते

मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले
मंचर: येथील विकास किसनराव बाणखेले ( वय 52) यांनी गुरुवारी मंचर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
विकास किसनराव बाणखेले नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी गावात आले होते, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांबरोबर गप्पा मारून ते घरी गेले. ते जेवणासाठी साडेअकरा वाजता आले नसल्याने त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि लाला अर्बन बँकेचे संचालक रामदास बाणखेले यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. परंतु आवाजाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता विकास यांनी एका वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनास्थळी मंचर पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे. त्यानुसार मंचर पोलिसांनी रामदास बाणखेले यांच्या फिर्यादीनुसार विकास बाणखेले यांनी आत्महत्या केल्याचा गुन्हा पोलिस हवालदार तानाजी हगवणे यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार सुमित मोरे करत आहे. माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचे विकास हे धाकटे चिरंजीव होतं. विकास यांच्या पाठीमागे आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे .