आईला कामावरून काढून टाकल्याने कंपनीत शिरून तरुणांचा राडा, टोळक्याची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:59+5:302021-07-12T04:07:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आईला कामावरून काढून टाकल्याने साथीदारांना घेऊन कंपनीत शिरून टोळक्याने कोयत्याने तोडफोड करून दहशत पसरविण्याचा ...

After the dismissal of the mother, the youth joined the company and the gang broke up | आईला कामावरून काढून टाकल्याने कंपनीत शिरून तरुणांचा राडा, टोळक्याची तोडफोड

आईला कामावरून काढून टाकल्याने कंपनीत शिरून तरुणांचा राडा, टोळक्याची तोडफोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आईला कामावरून काढून टाकल्याने साथीदारांना घेऊन कंपनीत शिरून टोळक्याने कोयत्याने तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

विकास राजेंद्र जानकर (वय २२, रा. येवलेवाडी, कोंढवा), केतन गंगाराम मोरे (वय २१, रा. पिसोळी), राजेश संभाजी चव्हाण (वय २६, रा. पिसोळी), सागर मुकुंद आहिरराव (वय २५), चेतन किशोर पाटील (वय २३, सर्व रा. पिसोळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना कोंढव्यातील टाईनिंग को़ औद्योगिक वसाहतीत शनिवारी दुपारी दीड वाजता घडली.

याप्रकरणी श्रीधर माधवराव नायडू (वय ६२, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. नायडू यांच्या कंपनीत सागर आहिरराव याची आई सरिता आहिरराव या पूर्वी कामाला होत्या. त्यांना कंपनीने कामावरून काढून टाकले होते. या कारणावरून सागर याने आपल्या साथीदारांना घेऊन कंपनीत प्रवेश केला. कोयत्याने फिर्यादी यांच्या डाव्या हातावर मारले. त्याच्या साथीदारांनी हातामधील कोयत्याने कंपनीच्या कार्यालयामधील तीन केबिनच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच कोयते हवेत फिरवून कंपनीमधील कामगारांवर दहशत निर्माण केली. त्याला घाबरून कामगार पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस तातडीने कंपनीत गेले. त्यांनी पाच जणांना अटक केली आहे.

Web Title: After the dismissal of the mother, the youth joined the company and the gang broke up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.