उपसरपंचांचे उपोषण आश्वासनानंतर मागे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:21 AM2017-08-12T02:21:46+5:302017-08-12T02:21:46+5:30

नीरा ग्रामपंचायतीचे सरपंच मासिक सभांचे बहुमताने केलेल्या ठरावांवर सही न करता कामे अडवून ठेवत असल्याने विकासकामांमध्ये अडवणूक केली जाते व अन्य काही मागण्यांच्या संदर्भात कारवाईस विलंब होत असल्याची कारणे देत नीरा येथील उपसरपंच बाळासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

 After the fasting fast after the assurances | उपसरपंचांचे उपोषण आश्वासनानंतर मागे  

उपसरपंचांचे उपोषण आश्वासनानंतर मागे  

Next

नीरा : नीरा ग्रामपंचायतीचे सरपंच मासिक सभांचे बहुमताने केलेल्या ठरावांवर सही न करता कामे अडवून ठेवत असल्याने विकासकामांमध्ये अडवणूक केली जाते व अन्य काही मागण्यांच्या संदर्भात कारवाईस विलंब होत असल्याची कारणे देत नीरा येथील उपसरपंच बाळासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. बुधवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेले उपोषण गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे यांच्या आश्वासनानंतर मागे घेतल्याची माहिती बाळासाहेब भोसले यांनी दिली.
नीरा ग्रामपंचायतीमध्ये चव्हाण पॅनलचे सहा व नीरा विकास आघाडीचे अकरा सदस्य आहेत. नीरा विकास आघाडीकडे बहुमत असले, तरी सरपंच पदाचा उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने चव्हाण पॅनलमधील अनुसूचित जमातीच्या दिव्या पवार यांची नीरा ग्रामपंचायत सरपंचपदी दोन वर्षां पूर्वी बिनविरोध निवड झाली आहे, तर बहुमत असलेल्या नीरा विकास आघाडीचे बाळासाहेब भोसले सध्या उपसरपंच आहेत. दोघेही सत्तेत असून नसल्यासारखे आहेत. गेली दोन वर्षे या दोन्ही गटांमध्ये राजकीय कुरघोड्या आहेत. यामधून सरपंच मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार उपसरपंच व विकास आघाडीच्या सदस्यांनी गटविकास अधिकाºयांकडे वेळोवेळी केली होती. याबाबत प्रशासनाकडून योग्यती कार्यवाही होत नसल्याने या सदस्यांनी ९ आॅगस्टपासून सदस्य व नीरेतील नागरिकांसह पुरंदर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात, काल गटविकास अधिकाºयांनी नीरा येथे येऊन दिवसभर केलेली शिष्टाई फोल ठरली होती. बुधवारी नीरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले व त्यांच्या सहकाºयांनी सकाळी दहा वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केल्यानंतर गटविकास अधिकाºयांनी पुन्हा चर्चा करून, या प्रकरणास जबादार असणाºयांवर एका महिन्यात कारवाईचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, या संदर्भातील तक्रारींकडे वेळोवेळी दुर्लक्ष करून ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला वेठीस धरणाºया विस्तार अधिकाºयावर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

Web Title:  After the fasting fast after the assurances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.