पतीचे छत्र हरपल्याने भाजी विकून तिला बनविले गुणवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 02:59 PM2022-06-18T14:59:08+5:302022-06-18T15:33:50+5:30

पोरीने आईच्या कष्टाचे चीज करूऩ मिळवले यश

after father death arati nalavade mother sold vegetables and got success in ssc exam | पतीचे छत्र हरपल्याने भाजी विकून तिला बनविले गुणवंत

पतीचे छत्र हरपल्याने भाजी विकून तिला बनविले गुणवंत

googlenewsNext

- तेजस टवलारकर 
पिंपरी : परिस्थिती कितीही बिकट असली तरीदेखील कष्ट करण्याची तयारी आणि इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय आरती नलावडे या विद्यार्थिनीने दिला आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाच आजारपणात उपचार घेत असलेल्या वडिलांचे निधन झाले. या स्थितीतून कसे सावरायचे असा प्रश्न समोर होता. परंतु, अशा कठीण काळातही न डगमगता कोणत्याही विषयाची शिकवणी न लावता आरती विनोद नलावडे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत यश खेचून आणले. पतीचे छत्र हरपल्यानंतर आईने तिला शिकविण्यासाठी भाजी विकली. पोरीने आईच्या कष्टाचे चीज करीत दहावीच्या परीक्षेत ९२.२० टक्के गुण मिळविले

आरती ही चिंचवड स्टेशन येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल येथील विद्यार्थिनी आहे. आरतीचे वडील दीर्घकाळ आजारी होते. या आजारामुळे त्यांचे ऑगस्ट २०२० मध्ये कोरोना काळात निधन झाले. त्यावेळी आरती नववीत होती. घरी, आई, आजोबा, मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे. वडिलांचे निधन झाल्यावर सुरुवातीचा एक महिना त्यातून सावरण्यातच गेला. शिकवणी लावण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे घरीच अभ्यास करणे सुरू केले.

घरची स्थिती बेताची असल्यामुळे तिला शिकविण्यासाठी आई भाजी विकण्याचे काम करू लागली. घरी अभ्यास करताना काही अडचणी आल्यास आरती शाळेतील शिक्षकांची मदत घेत. आई तसेच घरातील सर्वच सदस्य पाठीशी उभे राहिले आणि शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी मदत केली. त्यामुळे तिला दहावीच्या परीक्षेत यश मिळाले. अकरावीमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर नीट परीक्षेची तयारी करून डॉक्टर होण्याची इच्छा आहे, असे आरतीने सांगितले.

क्लास न लावता शाळेतच मार्गदर्शन...
आरतीने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेने तिचे अभिनंदन केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले, वर्गशिक्षक संजीव वाखोरे यांनी परीक्षेसाठी आरतीला मार्गदर्शन केले.

आरती चिखली घरकुल येथे राहते. घर लांब असूनही ती नियमितपणे शाळेत येत होती. सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा सहभाग होता. कविता, लेखन, खेळ, नृत्य यामध्येही ती हुशार आहे. महापालिकेने कोरोना काळात सुरू केलेल्या चाईल्ड हेल्पलाईनमधील तिच्या सहभागाबद्दल आयुक्तांनी कौतुक केले होते.
- विक्रम काळे, प्राचार्य, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल, चिंचवड

Web Title: after father death arati nalavade mother sold vegetables and got success in ssc exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.