काही मिनिटांच्या चौकाला आले नदीचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:33 AM2021-02-20T04:33:10+5:302021-02-20T04:33:10+5:30

या चौकात येणारे तीन रस्ते अति तीव्र चढाईचे व उताराचे असल्यामुळे या चौकाची भौगोलिक परिस्थिती एखाद्या खोलगट भांड्याप्रमाणे झाली ...

After a few minutes, the river came to an end | काही मिनिटांच्या चौकाला आले नदीचे रूप

काही मिनिटांच्या चौकाला आले नदीचे रूप

Next

या चौकात येणारे तीन रस्ते अति तीव्र चढाईचे व उताराचे असल्यामुळे या चौकाची भौगोलिक परिस्थिती एखाद्या खोलगट भांड्याप्रमाणे झाली आहे. पूर्वी हा परिसर शहराच्या टेकड्या म्हणून ओळखल्या जात असे. त्यामुळे येथे पावसाच्या काळात टेकड्यांवरुन येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे येथे नैसर्गिक पाण्याचे स्रोत तयार होऊन ओढ्यात रूपांतर झाले आहे. हाच ओढा पुढे गंगा धाम चौकातून मार्केट यार्ड परिसरातून महर्षीनगर येथे प्रवाहित होतो. त्यामुळे येथील चौकात पावसाच्या पाण्यामुळे इथे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी या चौकात असलेल्या कल्व्हर्टरला लागूनच असलेले अतिक्रमण काढून टाकून या ओढ्याचा पाण्याचा प्रवाह पुन्हा प्रवाहित करावा, अशी नागरिक मागणी करत आहे.

---

२५ सप्टेंबर २०१९ ला आलेल्या पूरसदृश परिस्थितीत या चौकातून रस्त्यावर नदीसारखे पाणी वाहत होते. हे पाणी पुढे भुसार मार्केटमध्ये घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

Web Title: After a few minutes, the river came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.