तब्बल पाच महिन्यांनंतर स्वारगेट बस डेपोत खणखणली पहिली घंटा; प्रवाशांचा आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 02:24 PM2020-08-20T14:24:41+5:302020-08-20T14:26:44+5:30

स्वारगेट गजबजू लागले, शिवाजीनगरला गर्दी कमी

After five months first bus ran away from swargate bus depo for travelling | तब्बल पाच महिन्यांनंतर स्वारगेट बस डेपोत खणखणली पहिली घंटा; प्रवाशांचा आनंद गगनात मावेना

तब्बल पाच महिन्यांनंतर स्वारगेट बस डेपोत खणखणली पहिली घंटा; प्रवाशांचा आनंद गगनात मावेना

googlenewsNext
ठळक मुद्देचौकशी कक्षात प्रवाशांकडून विविध शहरांच्या गाड्यांची विचारणा सुरू

पुणे: एसटीच्या प्रवासाला परवानगी मिळताच स्वारगेट, शिवाजीनगर ही एसटी स्थानके गजबजू लागली. स्वारगेटहून सकाळी सहा वाजता लवासासाठी पहिली गाडी सोडण्यात आली. शिवाजीनगरहूनही सकाळीच गाड्या सोडण्यात आल्या.
पहिली कोरोना टाळेबंदी २३ मार्चला सुरू झाली. तेव्हापासून या दोन्ही महत्वाच्या स्थानकांवर शुकशुकाट होता. त्यांची आजची सकाळ मात्र प्रवाशांच्या चौकशांनीच उजाडली. स्वारगेटहून दुपारी १ वाजेपर्यंत ४७ गाड्या सोडण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने सोलापूर ,पंढरपूर, मुंबई तसेच सातारा सांगली कराड, कोल्हापूर ही शहरे आहेत. 
संदीप पाटील हे प्रवासी म्हणाले, तीन महिन्यांनी कोल्हापूरला घरी चाललो आहे. पुण्यातच अडकलो होतो. वैभव डुब्बेवार म्हणाले, कराड चे एक काम तीन महिने थांबले होते. एसटी सुटणार याची माहिती मिळताच सकाळीच आलो. गाडी आली आणि तिकीटही मिळाले. आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे बैठकीत होत्या. गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. चालक वाहक ही पुरेशा संख्येने आहेत, त्यामुळे नियोजनात कसलीही अडचण येणार नाही असे बांद्रे यांच्या सहायकाने सांगितले. 
चौकशी कक्षात प्रवाशांची विचारणा सुरू झाली आहे. स्वारगेटच्या कक्षातील रफिक अत्तार यांनी सांगितले की सकाळपासूनच अनेकजण विविध शहरांच्या गाड्यांची चौकशी करत आहेत. अनेक दिवसांनी ध्वनीवर्धकावरूध गाडीची घोषणा करत आहे असे ते म्हणाले. 
शिवाजीनगर एसटी स्थानकाचे मेट्रोच्या कामामुळे वाकडेवाडीला स्थलांतर झाले आहे. तिथे प्रवाशांची संख्या फारशी नव्हती. गाड्याही कमी होत्या. 

Web Title: After five months first bus ran away from swargate bus depo for travelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.