चार दिवसांनंतर १९ गावांचे पाणी केले सुरू, आश्वासनानंतर भामाआसखेडचे आंदोलक तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:06 AM2018-04-05T03:06:43+5:302018-04-05T03:06:43+5:30
भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना एमआयडीसीमध्ये रोजगार व प्रकल्पबाधित २३ गावांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणार असाल तरच एमआयडीसीसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा सुरू करू, असा अल्टिमेटम धरणग्रस्तांनी दिला होता. मात्र
पाईट - भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना एमआयडीसीमध्ये रोजगार व प्रकल्पबाधित २३ गावांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणार असाल तरच एमआयडीसीसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा सुरू करू, असा अल्टिमेटम धरणग्रस्तांनी दिला होता. मात्र याबाबत पाटबंधारेच्या अधिकाºयांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलकांनी थोडी नरमाईची भूमिका घेत बुधवारी चाकण म्हाळुंगे औद्योगिक क्षेत्र व १९ गावांचा पाणीपुरवठा सुरू केला.
या वेळी पाणीपुरवठा विभागाचे जयदीप अग्निहोत्री, बळवंत डांगले, चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले, रोहिदास गडदे, स्वप्निल येवले, अनिल देशमुख व भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.
भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकºयांनी पुनर्वसनाबरोबरच औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना नोकºया व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी टंचाई भासू नये, यासाठी धरणाच्या दोन्ही बाजूच्या गावांना पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागण्या करीत म्हाळुंगे व चाकण औद्योगिक क्षेत्र व १९ गावांचा पाणीपुरवठा बंद केला होता. गेले चार दिवस आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. गेली ३५ वर्षे आम्ही आमच्या मागण्यांसाठी धडपड करीत असून शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अजूनही शासन आमचा छळ करीत आहे.
भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकºयांचे नोकरी व पाणीपुरवठा या मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी प्रशासन, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी, प्रकल्पबाधित शेतकरी यांची सोमवारी (दि. ९) बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.
या वेळी करंजविहीरे येथे पाण्याच्या टंचाईच्या त्रासाला वैतागलेल्या महिलांनी पंपहाऊसचा अगोदरच ताबा घेतला होता. परंतु प्रकल्पबाधित शेतकरी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यात समझोता झाल्याने पुढील अनर्थ टळला.
-प्रत्येक प्रकल्पबाधित शेतकºयाच्या कुटुंबातील शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनीत कायमस्वरूपी काम मिळावे व बुडीत क्षेत्रातील प्रत्येक गावाला २३ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे इत्यादी मागण्यांना संमती दिली असल्याने आज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.