चार मृत्युनंतर ठेकेदाराला जाग, साईड पट्टीवर मुरूम टाकण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:40+5:302021-03-21T04:10:40+5:30
चार दिवसापूर्वी सणसर येथे दुचाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 39 फाटा येथे साईड ...
चार दिवसापूर्वी सणसर येथे दुचाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 39 फाटा येथे साईड पट्टी वरून खाली आल्याने साखरेने भरलेला ट्रक पलटी होऊन त्या पोत्या खाली अडकलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला होता.काल शिवशाही बस ने ऊसतोड मजुरांच्या बैलगाडीला धडक दिल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला होता. तर बैलगाडी चालक पतीपत्नी जखमी झाले आहेत.त्यामुळे हा रस्ता साईट पट्टी अभावी मृत्यूचा सापळा ठरला होता. मात्र साईड पट्टी जर वेळीच भरली असती तर हे चार निष्पाप जीव वाचले असते.
राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्याला पट्टी
या रस्त्याचे डांबरीकरण होऊन एक महिना उलटला मात्र ठेकेदाराने मुरूम टाकून साईड पट्ट्या भरणे गरजेचे होते. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राष्ट्रीय महामार्ग कडे वर्ग करण्यात आला आहे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरून डांबरीकरण चालू असताना व डांबरीकरण झाल्यानंतर प्रवास केला की नाही की त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली होती असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
मुरूम टाकण्यास सुरुवात
या रस्त्याच्या डांबरीकरणा नंतर साईड पट्टीच्या प्रश्नावर युवासेना अध्यक्ष पिंटू गुप्ते, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष दिलीप निंबाळकर ,सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या रस्त्याच्या साईड पट्टी भरण्याच्या कामाला सुरुवात झाली.
रस्त्याच्या कामानंतर तब्बल एक महिन्यानंतर साईड पट्टी साठी मुरूम टाकण्यास सुरूवात करण्यात आली