...अन् आईने फोडला हंबरडा; बाहुलीला फाशी दिल्यानंतर चिमुरड्याने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 07:40 PM2022-06-01T19:40:09+5:302022-06-01T19:43:14+5:30

हाॅरर चित्रफित पाहण्याची होती सवय...

after hanging the doll 8 year old boy took the gallows hanged ownself and suicided | ...अन् आईने फोडला हंबरडा; बाहुलीला फाशी दिल्यानंतर चिमुरड्याने घेतला गळफास

...अन् आईने फोडला हंबरडा; बाहुलीला फाशी दिल्यानंतर चिमुरड्याने घेतला गळफास

googlenewsNext

पिंपरी : आठ वर्षांच्या मुलाने खेळत असताना बाहुलीला फाशी दिली. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेतला. हाॅरर चित्रफित पाहण्याची मुलाला सवय होती. त्यातून त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. थेरगाव येथे ही घटना घडली.  

कमल खेम साऊद (वय ८, रा. १६ नंबर बस स्टॉप, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २९) दुपारी दोनच्या सुमारास कमल आणि त्याचा लहान भाऊ आणि बहीण हे खेळत होते. त्यावेळी कमल याने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. बाहुली मृत पावल्याचा समज झाल्यानंतर कमल याने खिडकीला बांधलेल्या दोरीने स्वतःही गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कमल हा मोबाईलमध्ये हाॅरर फिल्म पाहत असल्याचे समोर आले. 

अन् आईने फोडला हंबरडा
कमल याने गळफास घेतल्याचे त्याच्या आईच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच खोलीमध्ये धाव घेतली. कमल अशी थट्टा करून नको, म्हणून आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कमलला अशा अवस्थेत पाहून आईने हंबरडा फोडला.

Web Title: after hanging the doll 8 year old boy took the gallows hanged ownself and suicided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.