काँग्रेस प्रवेशानंतर अनंता दारवटकर यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:27+5:302021-01-25T04:13:27+5:30
करण्यात आली. आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेेवणनाथ दारवटकर यांचे सुपुत्र व पंचायत ...
करण्यात आली.
आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेेवणनाथ दारवटकर यांचे सुपुत्र व पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांनी सकाळी कॅाग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा अर्ज भरुन आपल्या कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. वेल्हे पंचायत समिती सभागृहात उपसभापती निवडीची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. प्रांतधिकारी राजेंद्र जाधव,तहसीलदार
शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी निवड प्रकियेचे काम पाहिले.
उपसभापतिपदासाठी केवळ अनंता रेवन्नाथ दारवटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने प्रांतधिकारी राजेंद्र जाधव यांनी उपसभापतिपदी अनंता दारवटकर यांची निवड झाल्याचे घोषित केले.
आमदार संग्राम थोपटे यांच्या विधानसभेच्या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर यांनी मदत केल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी त्याचे चिरंजीव पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांना सभापती पद देण्याचा शब्द दिला होता. परंतु कँाग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पंचायत समिती
सदस्यांनी आमदारांचा आदेश जुगारुन सभापतीपदी काँग्रेसचे दिनकर सरपाले यांना सभापतीपदी विराजमान केले होते. या दरम्यान आमदार व पचायत समिती सदस्यांमध्ये
अंतर्गत कलह निर्माण झाला होता. दरम्यान उपसभापती सीमा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यांने उपसभापतीपद रिक्त झाले होते.
आमदार संग्राम थोपटे यांनी पंचायत समिती सदस्य व तालुका काँग्रेस कार्यकारिणीची तातडीची बैठक राजगड कारखान्याच्या सभागृहात बोलाविली होती. यावेळी जर अनंता दारवटकर यांनी काँग्रेस पक्षात
प्रवेश केला तरच शब्द पाळला जाईल यावर एकमत झाले. यानुसार शुक्रवारी सकाळी आमदार संग्राम थोपटे यांनी यांच्या उपस्थित पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांच्या कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षात प्रवेश करुन घेतला त्यानंतर अनंता दारवटकर यांच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ घातली. यावेळी सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परीषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस
दिलीप बाठे, राजगड कारखान्याचे संचालक संदीप नगिने, शोभाताई जाधव,पंचायत समिती सदस्या सीमा राऊत, संगीता जेधे, माजी उपसभापती
चंद्रकांत शेंडकर, नाना राऊत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, शिवाजी चोरघे, भाऊ दसवडकर, माजी तालुका अध्यक्ष दिलीप लोहकरे, संतोष मोरे आदी उपस्थित होते.
फोटोसाठी ओळ - पंचायत समिती वेल्हे(ता. वेल्हे) आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर नवनिर्वाचित उपसभापती अनंता दारवटकर व इतर.