प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर प्रेमवीराने 'अशा' प्रकारे व्यक्त केला संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 12:54 PM2020-08-27T12:54:40+5:302020-08-27T12:57:09+5:30

प्रेयसी रिक्षावाल्याबरोबर पळून गेल्याच्या रागातून रिक्षाचालकांचे मोबाईल चोरण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता..

After the lover's family refused to marriage, the lover expressed his anger in such a way | प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर प्रेमवीराने 'अशा' प्रकारे व्यक्त केला संताप 

प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर प्रेमवीराने 'अशा' प्रकारे व्यक्त केला संताप 

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : बिबवेवाडीतील घटना

पुणे : प्रेयसी रिक्षावाल्याबरोबर पळून गेल्याच्या रागातून रिक्षाचालकांचे मोबाईल चोरण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात एका प्रेमवीराने मित्राच्या मदतीने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्यांची तोडफोड केली. बिबवेवाडी पोलिसांनी दोघांनाही तातडीने अटक केली आहे. 
शरद तुकाराम पाटोळे (वय २०, रा़ टिळेकरनगर) आणि कुमार गोपाळ राठोड (वय १९, रा़ अण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़  या दोघांनी रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा ८ वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार अण्णाभाऊ साठेनगर येथील गुलमोहोर कॉलनीत मध्यरात्री एक वाजता घडला.


याप्रकरणी जमीर शमशुद्दीन शेख (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पाटोळे याचे एका तरुणीबरोबर पे्रमसंबंध होते. मात्र, तरुणीच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नास विरोध होता़ तर शरद याने अनेकदा प्रयत्न करुनही त्यांनी  प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शरद याने त्यांच्या घराच्या परिसरात गोंंधळ घालून त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीच्या आईचा विरोध कायम होता. यामुळे चिडलेल्या शरद याने कुमार राठोड याच्या मदतीने मध्यरात्री या तरुणीच्या घराजवळील पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक केली. त्यात ४ रिक्षा, एक रिक्षा टेम्पो, २ मोटारी, दुचाकी यांचे नुकसान केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. 
़़़़़़़़़़
नकारामुळे तोडफोड
प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने चिडून आरोपीने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 
कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी

Web Title: After the lover's family refused to marriage, the lover expressed his anger in such a way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.