ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील चाळकवाडी टोलनाका झाला सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:25 PM2017-09-29T13:25:57+5:302017-09-29T14:49:59+5:30

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्यात आला असून ग्रामस्थांच्या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला.

After the movement of the villagers, the Chalkavadi TolaNaka started | ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील चाळकवाडी टोलनाका झाला सुरु

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील चाळकवाडी टोलनाका झाला सुरु

Next
ठळक मुद्देमहामार्गात गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना न मिळाल्यामुळे व महामार्गाची अर्धवट असलेली कामे या संदर्भात चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन टोलनाका बंद केला होता.जो पर्यंत येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही, तो पर्यंत टोलनाका सुरु न करण्याची भूमिका आमदार शरद सोनवणे व ग्रामस्थांनी घेतली होती.येत्या चार महिन्यात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद असलेला टोलनाका सुरु करण्यात आला आहे.

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील टोलनाका ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करुन बंद केला होता. हा टोलनाका सुरु करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर ३ वेळा बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत चाळकवाडी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत या मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे पालकमंत्री गिरीष बापट यांनी टोलनाका सुरु करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुरुवारी (दि. २८) मध्यरात्री बारा वाजल्यापासून हा टोलनाका सुरु करण्यात आला. 
पुणे नाशिक महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणात चाळकवाडी येथील धर्मशाळा व पिंपळवंडी बसस्टॅण्ड येथील स्मशानभूमी गेली होती. तसेच पुणे नाशिक महामार्गात गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना न मिळाल्यामुळे व महामार्गाची अर्धवट असलेली कामे या संदर्भात चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन टोलनाका बंद केला होता. जो पर्यंत येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही, तो पर्यंत टोलनाका सुरु न करण्याची भूमिका आमदार शरद सोनवणे व ग्रामस्थांनी घेतली होती. 
या भूमिकेनंतर पालकमंत्री बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त रत्नाकर गायकवाड, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी झोडगे आणि इतर अधिकाºयांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत चाळकवाडी येथील धर्मशाळा व स्मशानभूमी बांधून देण्यात येणार असल्याचे ठरले. तसेच ज्या बारा गावांमधील बाधित शेतकºयांची न्यायालयात असलेली ५३.८४ कोटी रक्कम ३ महिन्यामध्ये दिली जाईल व आळेफाटा नारायणगाव कळंब व मंचर येथील बाह्यवळणांची राहिलेली अपूर्ण कामे व बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई डिसेंबर २०१७ पर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच चाळकवाडी टोलनाक्यालगत असलेल्या बाधित १३ शेतकºयांना घरांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. येत्या चार महिन्यात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद असलेला टोलनाका सुरु करण्यात आला आहे.

Web Title: After the movement of the villagers, the Chalkavadi TolaNaka started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.