मुंबईनंतर आता पुण्यातही होणार फिरत्या बसमध्ये 'कोविड -१९' चाचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:07 PM2020-05-20T21:07:56+5:302020-05-20T21:08:19+5:30

मोबाईल एक्स-रे, रक्त चाचणी, रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण व तापमान याची चाचणी करणार

After Mumbai Covid-19 test will be conducted in Pune in a mobile bus | मुंबईनंतर आता पुण्यातही होणार फिरत्या बसमध्ये 'कोविड -१९' चाचणी 

मुंबईनंतर आता पुण्यातही होणार फिरत्या बसमध्ये 'कोविड -१९' चाचणी 

Next
ठळक मुद्देप्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात जाऊन नागरिकांचे स्वॅब संकलन चाचणी

पुणे :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिका व क्रस्रा डायग्नॅस्टिक्स प्रा़लि़ यांच्या संयुक्त विद्यमाने, कोविड -१९ चाचणी करिता अत्याधुनिक तांत्रिक बस तयार करण्यात आली आहे. सदर बस कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात जाऊन नागरिकांचे स्वॅब (घशातील स्त्रावाचे नमुने) संकलन चाचणी करणार आहे.  तसेच मोबाईल एक्स-रे, रक्त चाचणी, रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण व तापमान याची चाचणी करणार आहे. 
    मुंबईनंतर आता पुण्यामध्ये प्रथमच या फिरत्या बसमध्ये कोविड- १९ चाचणी होणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांच्यासह आदी अधिकारी व पदाधिकाºयांच्या उपस्थितीत, या कोरोना संशयित रूग्णांची चाचणी करणाºया अत्याधुनिक उपकरणासहित वातानुकुलित फिरत्या बसचे लोकार्पन करण्यात आले.

Web Title: After Mumbai Covid-19 test will be conducted in Pune in a mobile bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.