आई-वडिलांनंतर मुलाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:22 AM2018-04-16T03:22:39+5:302018-04-16T03:22:39+5:30

 तो केवळ आठ वर्षांचा असून, रुग्णालयात उपचार घेत आहे; परंतु त्याला आता या जगात एकट्यालाच जगावे लागणार आहे. कारण, त्याच्या आईवडिलांसोबतच भावाचाही मृत्यू झाल्याने तो आता एकाकी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

 After the parents, the death of a child | आई-वडिलांनंतर मुलाचाही मृत्यू

आई-वडिलांनंतर मुलाचाही मृत्यू

Next

कर्वेनगर - तो केवळ आठ वर्षांचा असून, रुग्णालयात उपचार घेत आहे; परंतु त्याला आता या जगात एकट्यालाच जगावे लागणार आहे. कारण, त्याच्या आईवडिलांसोबतच भावाचाही मृत्यू झाल्याने तो आता एकाकी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ारजे माळवाडीजवळील न्यू अहिरेगाव परिसरात गुरुवारी (दि.१२) गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील चौघेही जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आईवडिल व एका मुलाचा मृत्यू झाला असून, एका मुलावर अद्याप उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिंद्रादेवी कनोजिया या गुरुवार (दि.१२) रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे उठल्या. घरातील वीज चालू करण्यासाठी दोन वायर जोडण्याचा प्रयत्न करत असताना, उडालेल्या विजेच्या ठिणग्यांनी घरात आगीचा भडका उडाला. यामध्ये बिंद्रादेवी यांच्यासह घरात झोपलेले पती रामलाल आणि मुले सत्यम, साहिल गंभीररीत्या भाजले.
जोराचा आवाज झाल्याने नागरिकांनी तिकडे धाव घेतली असता, घराचा दरवाजा लांब उडून पडलेला आणि घरात आग लागलेली आढळली. या वेळी नागरिकांनी लगेचच पाणी टाकून आग विझवत, चौघां जखमींना उपचारासाठी ससून मध्ये हलवले. बिंद्रादेवी कनोजिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि जखमी रामलाल कनोजिया (वय ४४) यांचा शनिवारी (दि. १४) उपचारादरम्यान मृत्यू
झाला. तर रविवारी रात्री साहिल रामलाल कनोजिया (वय६) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता या दुर्घटनेतील सत्यम रामलाल कनोजिया (वय ८) हाच रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आलेली आहे.

घराला नव्हती खिडकी
रात्री झोपताना गॅसचा रेग्युलेटर बंद करण्यास हे विसरले असावेत किंवा लिकेज झालेला गॅस घरात साठून, त्याचा आगीशी संपर्क येताच आगीचा भडका उडाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कुटुंब राहत असलेल्या खोलीला एकही खिडकी नव्हती, त्यामुळे त्यात गॅस अडून राहिला असेल अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. रामलाल हे रंगकाम करत असल्याची माहिती मिळाली असून, ते या भाड्याच्या घरात काही महिन्यांपूर्वी राहण्यास आल्याचे समजते.

Web Title:  After the parents, the death of a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.