१० कोटी भरल्यानंतर खंडित सीएनजीचा पुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:27+5:302021-06-19T04:09:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीकडून एमएनजीएल (महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.) थकीत रक्कम भरण्यास उशीर झाल्याने न.ता.वाडी व कात्रज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपीकडून एमएनजीएल (महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.) थकीत रक्कम भरण्यास उशीर झाल्याने न.ता.वाडी व कात्रज डेपोचा सीएनजीचा पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र शुक्रवारी पीएमपीने १० कोटी रक्कम भरल्याने तो पुरवठा पूर्ववत करण्यात आला. पीएमपीला बुधवारीच पिंपरी चिंचवड महापालिकेकडून १२ कोटी प्राप्त झाले होते. मात्र ते एमएनजीएलकडे वर्ग करण्यास उशीर झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे सोळाशे बसेस सीएनजीवर धावतात. यासाठी सुमारे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून गॅसपुरवठा केला जातो. मात्र मागील काही महिन्यांपासून सीएनजीचे ४९ कोटी २६ लाख रुपये थकले होते.
थकबाकी भरण्यासाठी एमएनजीएलने प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र थकबाकी न भरल्याने एमएनजीएलने पीएमपीच्या दोन डेपोचा पुरवठा खंडित केला होता.