मतदानानंतर झाला सोशल मीडिया शांत
By admin | Published: October 17, 2014 12:06 AM2014-10-17T00:06:16+5:302014-10-17T00:15:41+5:30
विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला.
Next
पुणो : विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडताच प्रचार थांबला आणि सोशल मीडियाही शांत झाल्याचे जाणवले. मोबाईलवर येणारे मेसेजही बंद झाले.
युती आणि आघाडी तुटल्याने उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होती. कमीत कमी वेळेत अधिकाधिक मतदारांर्पयत पोहोचायचे होते. त्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियावर जास्त भर दिला.
तरुणांकडून व्हॉट्स अॅप व फेसबुकचा अधिक वापर होत आहे. याचाच फायदा घेत उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचारास
प्राधान्य दिले.
फेसबुकवर उमेदवाराचे छायाचित्र लोड करून मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. उमेदवारांच्या ठिकठिकाणी झालेल्या सभेचा व्हीडिओदेखील फेसबुकवर पाहायला मिळत होता. (प्रतिनिधी)