कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर समाजाने स्वीकारले : ज्ञानदेव कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:59+5:302021-03-30T04:09:59+5:30

-- इंदापूर : तृतीयपंथी म्हणून समाजात वावरत असताना, अनेकांनी नावे ठेवली. समाजापेक्षा जास्त नातलगांनी वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली. मात्र ...

After proving his accomplishments, the society accepted him: Gyandev Kamble | कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर समाजाने स्वीकारले : ज्ञानदेव कांबळे

कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर समाजाने स्वीकारले : ज्ञानदेव कांबळे

Next

--

इंदापूर : तृतीयपंथी म्हणून समाजात वावरत असताना, अनेकांनी नावे ठेवली. समाजापेक्षा जास्त नातलगांनी वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली. मात्र आयुष्यातील प्रत्येक अडचणीशी धैर्याने व हिंमतीने दोन हात करून मात केली. पहिला तृतीयपंथी सरपंच म्हणून निवडून आलो. कर्तृत्व सिद्ध केले तेव्हा मला समाजाने स्वीकारले, अशी भावना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावचे सरपंच ज्ञानदेव ऊर्फ माऊली कांबळे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य क्रांतिसूर्य सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावंत यांनी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील रत्नपुरी येथे पार पडला. यावेळी विविध मान्यवर पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी ज्ञानदेव कांबळे बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य क्रांतिसूर्य सामजिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार २०२१ मध्ये क्रांतिसूर्य आरोग्य संजीवनी पुरस्कार डॉ. पोपट कुंभार यांना शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रांतिसूर्य सामजिक संघटना, समाजात समता निर्माण करण्यासाठी अग्रगण्य आहे असे मत डॉ. कुंभार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राचा क्रांतिसूर्य पुरस्कार, प्रसिद्ध मानवाधिकारतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांना देण्यात आला, तर आदर्श सरपंच शशिकला बाबर (डिकसळ, सांगोला), आदर्श शिक्षक प्रा. बाळासाहेब सर्वगोड (वालचंदनगर), प्रा. राहुल वाघमारे (पुणे), क्रांतिसूर्य समाजरत्न पुरस्कार रत्नाकर मखरे (इंदापूर), किशोर ददारे ( पंढरपूर), नितीन वाघमारे ( सांगोला ), राहुल खरात (नाशिक), डॉ. रघुनाथ जोगदंड ( अंबेजोगाई), क्रांतिसूर्य समाजभूषण पुरस्कार सागर बाबा मिसाळ (जंक्शन ), प्रविण शिंदे ( पुणे ), सरपंच ज्ञानदेव (माऊली) शंकर कांबळे (तरंगफळ, माळशिरस) यांना देण्यात आला.

तर महिला समाजरत्न पुरस्कार ज्योती अदाटे ( सांगली ), जयश्री झिंगळे ( सोलापूर), क्रांतिसूर्य कविरत्न पुरस्कार सुनिल साबळे ( वालचंदनगर ), कलारत्न पुरस्कार प्रियंका काळे, गणेश वसव, ( सातारा ), गजानन गडकर ( अभिनेते ) यांना देण्यात आला तर आदर्श पत्रकार म्हणून सागर शिंदे ( इंदापूर ) यांना पुरस्कार यांना देण्यात आला.

--

फोटो क्रमांक : २९ इंदापूर पुरस्कार वितरण

फोटो ओळ : महाराष्ट्र राज्य क्रांतिसूर्य सामजिक संघटनेच्या वतीने सरपंच ज्ञानदेव ( माऊली ) कांबळे यांना पुरस्कार देताना पदाधिकारी.

Web Title: After proving his accomplishments, the society accepted him: Gyandev Kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.