वास्तवदर्शी आकडेवारी सादर केल्यावरच पाण्याचा कोटा वाढवून मागणार : सौरभ राव 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 07:00 AM2018-11-01T07:00:00+5:302018-11-01T07:00:00+5:30

जलसंपदाला महापालिका दोष देत नाही, देणार नाही असे स्पष्ट करून राव म्हणाले, त्यांची आकडेवारी खरी असेल, मात्र शहराला खरोखर किती पाणी मिळते हेही पाहायला हवे.

After realistic counting public data, the demands for water quota increased: Saurabh Rao | वास्तवदर्शी आकडेवारी सादर केल्यावरच पाण्याचा कोटा वाढवून मागणार : सौरभ राव 

वास्तवदर्शी आकडेवारी सादर केल्यावरच पाण्याचा कोटा वाढवून मागणार : सौरभ राव 

Next
ठळक मुद्देजलसंपदाचे आकडे खरे, वस्तुस्थिती वेगळी जनगणना विभागाकडून पुणे शहराची नक्की लोकसंख्येचा निश्चित आकडा घेण्यात येईलग्रामपंचायती, मोठ्या टाऊनशीप, काही उद्योग यांना रोज साधारण १५० एमएलडी पाणी येत्या आठ ते दहा दिवसात हा अहवाल तयार पर्वतीपासून लष्कर जलकेंद्रापर्यंत पाईपमधून पाणी न्यायचे काम नोव्हेंबरमध्ये पुर्ण होणारपाच तास पाणी हे पिण्याच्या पाण्याचे नियोजनही पाणी वाचवण्याचाच भाग

पुणे: जलसंपदा देते ती पाण्याची आकडेवारी खरी असेल. मात्र ती तांत्रिक आहे. प्रत्यक्षातील गोष्टीत अनेकदा तफावत असते. आता आम्ही लोकसंख्येची व गरजेची वस्तूनिष्ठ आकडेवारी सादर करूनच कोटा वाढवून देण्याची मागणी करू असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
जलसंपदाला महापालिका दोष देत नाही, देणार नाही असे स्पष्ट करून राव म्हणाले, त्यांची आकडेवारी खरी असेल, मात्र शहराला खरोखर किती पाणी मिळते हेही पाहायला हवे. काही गोष्टी तांत्रिकदृष्ट्या दिसत असतात, प्रत्यक्षात मात्र तसे नसते. पण त्यावर टिका करण्याऐवजी आम्ही काही आकडेवारी जमा करत आहोत. जनगणना विभागाकडून पुणे शहराची नक्की लोकसंख्येचा निश्चित आकडा घेण्यात येत आहे. जनगणना झाली त्या वर्षापासून आतापर्यंत त्यात किती वाढ झाली तेही पाहिले जाणार आहे. गेल्या काही वर्षात पुणे शहरात येणाऱ्या , वर्ष सहा महिने राहणाऱ्या नागरिकांच्या संख्येत कितीतरी वाढ झाली आहे. त्याला फ्लोटिंग लोकसंख्या म्हणतात. किमान ५ लाख जणांची अशी ये-जा असावी. ते लोक इथे राहतात, त्यांना पाणी लागतेच. त्याशिवाय महापालिकेच्या परिघाबाहेर ५ किलोमीटर अंतरापर्यंतच्या ग्रामपंचायती, मोठ्या टाऊनशीप, काही उद्योग यांना रोज साधारण १५० एमएलडी पाणी द्यावे लागते. तेवढी तूट शहराच्या पाण्यात येते, मात्र ती जमेस धरली जात नाही. अशा काही गोष्टी आहेत. त्याचा अहवाल महापालिका तयार करत आहे. हा अहवाल सरकारकडे म्हणजे जलसंपदाकडे दिला जाईल. तो दाखवूनच आम्ही वाढीव कोट्याची मागणी करू. येत्या आठ ते दहा दिवसात हा अहवाल तयार होईल.’’
महापालिकेच्या पाणी वितरण यंत्रणेत काही दोष आहेतच. ते महापालिका नाकारत नाही असे कबूल करून राव म्हणाले, ‘‘ पर्वतीपासून लष्कर जलकेंद्रापर्यंत पाईपमधून पाणी न्यायचे काम नोव्हेंबरमध्ये पुर्ण होणार आहे. फक्त या एका कामातून १०० ते १५० एमएलडी पाणी वाचणार आहे. त्याचा शहराला उपयोग होईल. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती आहे. त्याचा शोध घेण्याची व ती गळती दूर करण्याची मोहिमच सुरू केली आहे. त्याचाही उपयोग होणार आहे. शहरातील पाणी योजना जुनी असल्याने स्थानिक स्तरावरही काही ठिकाणी मोठी गळती होऊन पाणी वाया जाते. काहीवेळा तांत्रिक अडचणींमुळेही पाईप फुटतात व तेवढे पाणी वाया जाते. हे सर्व प्रकार बंद व्हावेत अशा दृष्टिने महापालिका प्रयत्नशील आहे.’’
पाच तास पाणी हे पिण्याच्या पाण्याचे नियोजनही पाणी वाचवण्याचाच भाग आहे असे राव यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘उपलब्ध पाणी साठा नियोजन करून वापरण्याचाच तो एक भाग आहे. नव्याने ते करताना काही त्रुटी, गोंधळ निर्माण होतील हे अपेक्षित धरले होते. त्याप्रमाणे काही ठिकाणी तसे झाले. अशा त्रुटी पाणी पुरवठा विभागामार्फत त्वरीत दूर करण्यात येत आहेत. सर्वांना समान पाणी मिळावे, ते पुरेशा दाबाने मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यातही काही तांत्रिक गोष्टींमुळे अडचणी निर्माण होतात. त्या पुर्ण करण्यात वेळ जातो.
शहराच्या एखाद्या भागातही पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये अशीच महापालिकेची भूमिका आहे. मात्र एखाद्या भागात असा प्रश्न निर्माण झाला म्हणजे संपुर्ण शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली असे होत नाही असेही राव यांनी सांगितले. ज्या भागातून तक्रारी येतात तिथे पाण्याचे टँकर पाठवले जात आहेत. तो काही कायमचा उपाय नाही हे बरोबर आहे. त्यामुळे तिथे दुरूस्तीचे, त्रुटी दूर करण्याचे कामही त्वरीत केले जात आहे असे राव म्हणाले.

Web Title: After realistic counting public data, the demands for water quota increased: Saurabh Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.