आवक वाढल्याने फळभाज्यांचे भाव स्थिर

By admin | Published: June 29, 2015 06:28 AM2015-06-29T06:28:48+5:302015-06-29T06:28:48+5:30

सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने घाऊक बाजारात फळभाज्यांची मुबलक आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बहुतेक फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले.

After rising arrivals, the price of the fruit is stable | आवक वाढल्याने फळभाज्यांचे भाव स्थिर

आवक वाढल्याने फळभाज्यांचे भाव स्थिर

Next

पुणे : सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने घाऊक बाजारात फळभाज्यांची मुबलक आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बहुतेक फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले. पाऊस थांबल्याने ग्राहकांकडूनही भाज्यांची मागणी वाढली आहे, असे असले तरी मागणीच्या तुलनेत आवक माफक असल्याने फारशी भाववाढ झालेली नाही.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली. मागील आठवड्यात पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली होती. रविवारी लसूण व घेवड्याच्या भावात प्रति दहा किलोमागे प्रत्येकी १०० रुपयांची घट झाली. तर तोंडल्याचे भाव १०० रुपयांनी वाढले. हिरवी मिरचीही ५० रुपयांनी उतरली. इतर भाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले.
रविवारी परराज्यातून हिमालच प्रदेशातून मटार १ ट्रक, कर्नाटकातून १५ ते १६ ट्रक कोबी, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, इंदौर येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातून ३.५ हजार गोणी लसूण, इंदौर, आग्रा आणि नाशिक परिसरातून ५० ते ५५ ट्रक बटाट्याची आवक झाली.
पुणे विभागातून ३०० ते ४०० गोणी सातारी आले, ५.५ ते ६ हजार पेटी टोमॅटो, ८ ते १० टेम्पो कोबी, १३ ते १४ टेम्पो फ्लॉवर, ८२२ ते १० टेम्पो ढोबळी मिरची, २५० गोणी भुईमूग शेंग, ८ ते १० टेम्पो लाल भोपळा, ३ ते ४ टेम्पो हिरवी मिरची, ३० ते ४० गोणी चिंच आणि सुमारे १०० ट्रक कांद्याची आवक झाली.

Web Title: After rising arrivals, the price of the fruit is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.