'दोन मिनिटे थांब देतो सिगारेट' म्हटल्याचा राग धरुन टपरीवाल्यावर ब्लेडने वार
By नम्रता फडणीस | Updated: November 20, 2023 14:16 IST2023-11-20T14:15:06+5:302023-11-20T14:16:32+5:30
आरोपीवर बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'दोन मिनिटे थांब देतो सिगारेट' म्हटल्याचा राग धरुन टपरीवाल्यावर ब्लेडने वार
पुणे : 'दोन मिनिटे थांब देतो सिगारेट' असे म्हटल्याचा राग मनात धरुन टपरीवाल्यावर ब्लेडने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 18 नोव्हेंबर रोजी बिबवेवाडी येथील खामकर गार्डन समोर रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी घडली. आरोपीवर बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल लोखंडे (रा.कांबळे वस्ती, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील काळूराम चव्हाण (रा. सुखसागर नगर बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या टपरीवर काम करीत बसले असताना आरोपीने त्यांना सिगारेट मागितली. तेव्हा दोन मिनिटे थांब देतो सिगारेट' असे टपरीवाल्याने म्हटले. त्याचा राग धरीत आरोपीने तुला आमच्या वस्तीत टपरी चालवायची आहे का नाही, तुला दाखवू का? अशी धमकी देत फिर्यादी टपरी बंद करीत असताना आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हातातील ब्लेडसारख्या वस्तुने फिर्यादी यांच्या गालावर मारुन त्यांना जखमी केले. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.