चिंचेची झाडे घेता घेता त्यांनी घरंच लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 09:07 PM2019-03-29T21:07:58+5:302019-03-29T21:09:09+5:30
पुण्यातील धायरी भागात राहणाऱ्या विशाल बाळु पाेकळे यांच्या घरावर दराेडा घालणाऱ्यांना पकडण्यात खंडणी विराेधी पथकाला यश आले आहे.
पुणे : पुण्यातील धायरी भागात राहणाऱ्या विशाल बाळु पाेकळे यांच्या घरावर दराेडा घालणाऱ्यांना पकडण्यात खंडणी विराेधी पथकाला यश आले आहे. अनेक वर्षांपासून पाेकळे यांच्या बागेतील चिंचेची झाडे घेण्यासाठी येणाऱ्यांनीच हा दराेडा घातल्याचे समाेर आले आहे. पाेलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पाेलिसांनी साेमनाथ विठ्ठल माने ( रा. धायरी), प्रविण विलास दाेडमिसे (वय 25 रा. भुगाव), सागर निलाप्पा गायकवाड (वय 23), संभाजी सिताराम गाेरे (वय 30) यांना अटक केली आहे. तर एक आराेपी फरार आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मार्च 2019 राेजी मध्यरात्री 5 ते 7 दराेडेखाेरांनी रायकरमळा, धायरी येथे राहणारे बागायतदार शेतकरी विशाल पाेकळे यांच्या घराचा दरवाजा ताेडून घरात प्रवेश केला. घरात असलेले पाेकळे यांचे आई, वडील आणि पत्नीचे दराेडेखाेरांनी हातपाय बांधले. तसेच त्यांना काठीने, लाथा- बुक्याने मारहाण करुन धरातील साेन्या चांदीचे दागीने, राेख रक्कम, माेबाईलसह नवीन माेटारसायकल दराेडा टाकून चाेरुन नेली. याप्रकरणी पाेकळे यांच्या पत्नी निता यांनी सिंहगडराेड पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली हाेती. त्यांच्या तक्रारीवरुन पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता.
या गुन्ह्याचा तपास खंडणी विराेधी पथकाचे पाेलीस निरीक्षक रघुनाथ जाधव व त्यांचे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे करीत हाेते. पाेलिसांनी पाेकळे यांच्याकडे काेणाचे येणे जाणे हाेते. काेणाशी वाद हाेते का या अनुशंगाने तपास करण्यास सुरुवात केली. पाेलिसांना तपास करत असताना पाेकळे यांच्याकडे अनेक वर्षांपासून चिंचेची झाडे घेण्यासाठी येणाऱ्या साेमनाथ माने याने त्याच्या साथिदारांच्या मदतीने हा दराेडा घातला असल्याची खबर मिळाली. या माहितीच्या आधारे शाेध घेत पाेलिसांनी माने याला धायरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखाेल तपास केल्यानंतर त्याने साथिदारांच्या मदतीने दराेडा घातल्याचे कबुल केले. त्यानंतर पाेलिसांनी इतर आराेपींना अटक केली. अद्याप एक आराेपी फरार असून पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत. पकडलेल्या आराेपींकडे पाेलिसांनी चाैकशी केल्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले. अटक केलेले आराेपी हे रेकाॅर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत.
खंडणी विराेधी पथकाने या आराेपींना पुढील तपासासाठी सिंहगडराेड पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे.