ठाणे, पुणेनंतर आता केतकी चितळेविरोधात पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 09:56 PM2022-05-14T21:56:02+5:302022-05-14T21:57:20+5:30

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्षा कविता संदेश आल्हाट (वय ४१, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

After Thane and Pune, now a case has been registered against Ketki Chitale in Pimpri Chinchwad | ठाणे, पुणेनंतर आता केतकी चितळेविरोधात पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हा दाखल

ठाणे, पुणेनंतर आता केतकी चितळेविरोधात पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबात बदनामीकारक आणि मानहानीकारक मजकूर फेसबुकवरून पोस्ट केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार  अभिनेत्री केतकी चितळे आणि नितीन भावे या दोघांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्षा कविता संदेश आल्हाट (वय ४१, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतकी चितळे ही अभिनेत्री असून त्यांचा सहकारी असलेला नितीन भावे हा वकील आहे. या दोघांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून बदनामीकारक व मानहानीकारक मजकूर फेसबुकवरून पोस्ट केला. या पोस्टमुळे समाजामध्ये व्देषाची भावना, तेढ व वैमनस्य निर्माण करण्याचे कृत्य करण्यात आले, असे फिर्यादीत नमूद आहे. 

फिर्यादी या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खराळवाडी येथील कार्यालयात आल्या. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर त्यांना ही पोस्ट दिसून आली. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: After Thane and Pune, now a case has been registered against Ketki Chitale in Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.