राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येतायेत त्यातून पक्षात शीतयुद्ध सुरु - आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 06:07 PM2023-06-22T18:07:17+5:302023-06-22T18:07:51+5:30
काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोळीयुद्ध ही दिसेल, आशिष शेलारांची टीका
इंदापूर : शरद पवार यांनी राजीनामा दिला, त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाकीच्या लोकांची वाक्ये हे राष्ट्रवादीतल वाक् युध्द होत. ते संपले व आता त्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येतायत त्यातून शीतयुद्ध चालू असल्याचे दिसत आहे. आता काही दिवसांनी टोळीयुद्ध सुद्धा दिसेल, असे मत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललेल्या घडामोडींवर टीपण्णी करताना शेलार म्हणाले की, महाराष्ट्राचे पक्षाच नेतृत्व कोणी करायचे हे त्यांनी ठरवायचे. पण सगळ्यांसमोर एकमत नाही. एकमत नसणे स्वाभाविक आहे. ते नैसर्गिक आहे की अनैसर्गिक की कोणी करत आहे ते काही काळामध्ये दिसेल. खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदा त्याच्या पक्षाची काळजी करावी. त्यांच्या पक्षामध्ये त्यांना मिळालेले नवीन स्थान, त्या स्थानाखाली सुरुंग तर नाही ना या बाबतची चिंता करावी. त्यांना दिलेल्या राज्यांतील काही राज्यांमध्ये राष्ट्रवादी आहे का हे मायक्रोस्कोप घेऊन शोधायला फिरावे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर बोलण्याचा विचार करावा, असा सल्लाही शेलार यांनी दिला.
उद्धव ठाकरे आपने सलगी क्यू की ये कौनसा हिंदुत्व है
माहिममध्ये उध्दव ठाकरे,ॲड. प्रकाश आंबेडकर व औरंगजेबाचे फोटो असलेले बॅनर झळकल्याच्या वृत्ताविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आपण कालपासून बाहेर असल्याने आपणास याची कल्पना नाही. पण ज्या पध्दतीचे बॅनर लावल्याचे माध्यमातून दिसते आहे, त्यामध्ये औरंगजेबाशी? त्याच्या कबरीशी आपुलकी जपणाऱ्यांबरोबर उद्धव ठाकरे व त्यांचा पक्ष असल्याचे चित्र सुस्पष्टच आहे. त्याचे उत्तर ठाकरे व संबंधितांना द्यावे लागेल. शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल हिंदी भाषेचा आधार घेऊन 'उनका हिंदुत्व औरंगजेब की जो कब्र है उसकी पूजा करने वालोके साथ क्यू फसा है. भारतीय जनता पार्टीका हिंदुत्व तो रामजन्मभूमी से लेकर उज्जैन के महाकालेश्र्वर तक,केदारनाथ से काशिनाथ तक का है, ये दुनिया ने देखा है, असे म्हणत, औरंगजेब की कब्र से प्यार करनेवालोंके साथ उद्धव ठाकरे आपने सलगी क्यू की ये कौनसा हिंदुत्व है ये बताये अशी विचारणा शेलार यांनी केली.