शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचा सरकारला घरचा आहेर; आंदोलनाचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 09:42 AM2024-01-05T09:42:26+5:302024-01-05T09:44:54+5:30
काल पुण्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर बैठक घेतली.
पुणे- काल पुण्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर बैठक घेतली. या बैठकीत काही प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीत ऊसतोड मजुरांना 34% दरवाढ तर मुकादमांना 01% कमिशन वाढ देण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला, त्यावर आनंद व्यक्त करत पंकजा मुंडेंनी बैठकीचा वृत्तांत दिला. तसेच, राज्यातील ऊसतोड मजुरांचे हित हे माझ्यासाठी सर्वतोपरी आहे, तर दुसरीकडे मुंडे यांनी राज्य सरकारला घरचा आहेरही दिला आहे.
"गोपीनाथ मुंडे महामंडळातून काहीच काम होत नाही. यासाठी मी असमाधानी आहे, मी जेव्हा मंत्री होते तेव्हा स्वत: बैठकी घेतल्या आहेत. आता मी स्वत: संविधानीक कामात नसल्यामुळे संबंधीतांना सांगू शकते हे लवकर करा. आता यासाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे लागले की काय अशी परिस्थिती होऊ नये, तसे असेल तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
...म्हणून भारत जोडो यात्रेत 'न्याय' शब्द जोडला; जयराम रमेश यांनी सांगितली इनसाईड स्टोरी
ऊसतोड कामगारांबाबत ऐतिहासिक निर्णय
भाजपात गेल्या अनेक दिवसांपासून नाराज मानल्या जात असलेल्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नेहमीच ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावरुन आवाज उठवला आहे. ऊसतोडकामगारांच्या प्रश्नासंदर्भाने अनेकदा विविध मागण्याही त्यांनी केल्या आहेत. स्वर्गीत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वडिलांची धुरा सांभाळून ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी नेतृत्व केलं आहे. त्याच अनुषंगाने आज ऊसतोड कामगार लवादाची बैठक आज पार पडली. या बैठकीत ऊसतोड मजुरांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली आहे.
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर आज पुण्याच्या साखर संकुलात राष्ट्रवादीचे प्रमुख व जेष्ठ नेते शरद पवार यांच्या आणि पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत ऊसतोड कामगार लवादाची बैठक पार पडली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आज प्रथमच ऊसतोड मजुरांच्या न्याय मागण्यांची पूर्तता करणारा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले, तसेच याबाबत समाधानही व्यक्त केले. महाराष्ट्र सहकारी साखर कारखान संघाचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला जयंत पाटील हेही उपस्थित होते.