महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू
By admin | Published: May 25, 2017 02:58 AM2017-05-25T02:58:51+5:302017-05-25T02:58:51+5:30
अखेर १ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बारामती बाजार समिती मध्ये शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : अखेर १ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बारामती बाजार समिती मध्ये शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. २२ एप्रिलपासून येथील तूर खरेदी केंद्र बंद होते. सोमवार (दि.२२ मे) पासून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. ३१ मेअखेर तूर खरेदी या ठिकाणी सुरू राहणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेड यांच्या वतीने सुरू असणारे हे केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे. २२ एप्रिलपासून या केंद्रावर तूर खरेदी बंद होती. तूर खरेदीचा हमीभाव प्रति क्विंटल ५०५० रुपये आहे. तूर शिल्लक असणाऱ्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर आणावी. हे केंद्र ३१ मे पर्यंत सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांनी तूर स्वच्छ व वाळवून विक्रीसाठी आणावी. तूर विक्रीसाठी आणताना नाफेडच्या निकषांनुसार आणावी, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.