Firodiya Karandak: फिरोदिया करंडकच्या प्राथमिक फेरीत बाजी मारून 'या' नऊ महाविद्यालयांची अंतिम फेरीत निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:51 PM2023-02-16T13:51:46+5:302023-02-16T13:51:59+5:30

11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत एकूण 30 महाविद्यालयांनी सहभाग घेतला

After winning the preliminary round of Firodia Karandak these nine colleges have been selected for the final round | Firodiya Karandak: फिरोदिया करंडकच्या प्राथमिक फेरीत बाजी मारून 'या' नऊ महाविद्यालयांची अंतिम फेरीत निवड

Firodiya Karandak: फिरोदिया करंडकच्या प्राथमिक फेरीत बाजी मारून 'या' नऊ महाविद्यालयांची अंतिम फेरीत निवड

googlenewsNext

पुणे :  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ देणाऱ्या 49 व्या  फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नऊ संघाची निवड झाली आहे.

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी ( सांबरी),  पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय ( मोहपाश), बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय ( तुम बहते रहना), सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय ( रिवाज), महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी , वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ( बंबई मेरी जान), जयवंतराव सावन्त अभियांत्रिकी महाविद्यालय हडपसर ( उपज), स. प. महाविद्यालय ( उबरमेन्सचं), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय ( फिर मिलेंगे), फर्ग्युसन कॉलेज ( वगसम्राज्ञी)  या संघांनी सोमवारी प्राथमिक फेरीत बाजी मारून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. 

11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत एकूण 30 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. आदित्य इंगळे, गिरीश दातार, अनमोल भावे, प्राजक्ता अत्रे आणि देवेंद्र गायकवाड  यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. स्पर्धेची अंतिम फेरी 25 व 26 फेब्रुवारी रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक सभागृहात होणार आहे.

Web Title: After winning the preliminary round of Firodia Karandak these nine colleges have been selected for the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.