वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:43+5:302021-06-18T04:08:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षभर खाद्यतेल तेलांच्या किमती प्रचंड मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीचे घराचे संपूर्ण बजेटच ...

After a year, edible oil became cheaper; Now eat happily! | वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत !

वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या वर्षभर खाद्यतेल तेलांच्या किमती प्रचंड मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीचे घराचे संपूर्ण बजेटच कोलमडून गेले होते. परंतु गेल्या आठ-दहा दिवसांत तेलाच्या किमतीत १५-२० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

कोरोनाचे संकट अधिक गंभीर असताना गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. अनेकांची आर्थिक ओढ-ताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख चढताच गेला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत होती. गेल्या वर्षभरात खाद्यतेलाचे भाव चांगलेच भडकले व दर तीन चार पटीने वाढत गेले. सूर्यफूलाच्या १५ किलो तेलाचे दर एक वर्षापूर्वी १७०० रुपये एवढे होते, यात एकाच वर्षात तब्बल २४२० एवढी झाली. परंतु गेल्या आठ दिवसांत तेलाच्या किमती पुन्हा कमी झाल्या आहेत. वर्षभरात शंभर टक्के वाढ झाली असताना आता केवळ १५-२० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. भविष्यात तेलाचे दर आणखी कमी होतील का याबाबत कोणतीही निश्चित नाही. यामुळेच सध्या व्यापारी अधिकचा माल खरेदी करताना थोडी काळजीच घेत आहेत.

--------

खाद्यतेलाचे दर (प्रती १५ किलो)

तेल आजचे दर मार्च २०२१ मार्च २०२०

सूर्यफूल २१२० २४२० १७००

शेंगदाणा २०७५ २३७५ २१००

सोयाबीन १८६० २०६० १४००

सरकी तेल १८४० २१०० १४५०

--------

भुईमुग, सूर्यफूलाचे उत्पादन बंदच झाले

पूर्वी भुईमुगच्या शेंगा, सूर्यफूलाचे उत्पादन घेत होतो. त्याचेच तेल काढून घरामध्ये वर्षभर वापरत असो. पण आता ही शेतपीक बंद झाली असून, खाद्यतेल विकतच घेतो.

- शुभांगी शेळके, शेतकरी, जुन्नर

-----

Web Title: After a year, edible oil became cheaper; Now eat happily!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.