भर दुपारी पावणोदोन लाखांचे दागिने लुटले

By admin | Published: December 10, 2014 11:09 PM2014-12-10T23:09:09+5:302014-12-10T23:09:09+5:30

जेजुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणा:या एका सराफी दुकानातून भर दुपारी पावणोदोन लाखांचे सोन्याचे दागिने मालकाच्या हातावर तुरी देऊन दोघांनी लंपास केले.

In the afternoon, looted jewelery of Pawanodon lakhs | भर दुपारी पावणोदोन लाखांचे दागिने लुटले

भर दुपारी पावणोदोन लाखांचे दागिने लुटले

Next
जेजुरी : जेजुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणा:या एका सराफी दुकानातून भर दुपारी पावणोदोन लाखांचे सोन्याचे दागिने मालकाच्या हातावर तुरी देऊन दोघांनी लंपास केले. 
जेजुरी-मोरगाव रस्त्यालगत एम. एम. सराफ बारामतीकर ज्वेलर्स आहे. बारा वाजण्याच्या सुमारास दुकानाचे मालक प्रशांत प्रकाश डहाळे हे ग्राहकांना दागिने दाखवित होते. यावेळी एक व्यक्ती काउंटरवर येऊन त्याने, ‘काल मी तुमच्या दुकानात आलो होतो, कपाटातील ती चेन व गंठण दाखवा’ असे सांगितले. डहाळे यांनी चेन व गंठण काढून काउंटरवर ठेवले.  त्यानंतर त्या दागिन्यांचे फोटो काढून घरच्यांना दाखवितो, असे म्हणून त्याने मोबाईलवर फोटो काढण्यास सुरुवात केली. डहाळे दुस:या ग्राहकाची पावती करीत असताना तो ते दागिने घेवून पळाला. तो पळत असल्याचे लक्षात येताच, डहाळेही त्याच्या मागे धरा.. धरा. ओरडत पळाले. थोडय़ाच अंतरावर चोरटय़ाचा साथीदार दुचाकीवर थांबलेला होता. ते दोघेही गाडीवर बसून सासवड रस्त्याने पसार झाले.  दुचाकीच्या नंबरप्लेटला लाल रंगाचे जर्किन बांधले असल्याने गाडीचा नंबर मिळू शकला नाही. चोरटे पळून जाताना गावातील तरुणांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे पसार झाले.(वार्ताहर)
 
4जेजुरी : पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर ते पोंढे या रस्त्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकी अडवून दुचाकीवरील महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील एक लाख 65 हजार रुपयांचे 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लूटून चोरटे पसार झाले. या प्रकरणाबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी  मंगळवारी (दि. 9) फिर्यादी सुनील रामचंद्र शिंदे रा. भरतगाव, ता. दौंड हे त्यांची पत्नी उषा यांना घेऊन दुचाकीवरून पोंढे या गावी जात होते. माळशिरसजवळील भुलेश्वर घाट ते पोंढे या कच्च्या रस्त्याने जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी आडवी घालून सुनील शिंदे यांची दुचाकी थांबविली व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पत्नी उषा यांच्या गळ्यातील साडेसहा तोळ्यांचे मंगळसूत्र व गंठण आणि कानातील दीड तोळा वजनाचे झुमके हिसकावून घेतले. तसेच, त्यांच्याकडील मोबाईल व मतदार ओळखपत्रही काढून घेतले. ‘पोलिसांकडे तक्रार केल्यास तुझा पत्ता माङयाकडे आहे. बघून घेईन,’ अशी धमकी देऊन चोरटय़ांनी त्यांच्याकडील चाकूने शिंदे यांच्या दुचाकीचे चाक पंक्चर केले व ते पसार झाले. 

 

Web Title: In the afternoon, looted jewelery of Pawanodon lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.