दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे?

By admin | Published: May 30, 2017 02:49 AM2017-05-30T02:49:07+5:302017-05-30T02:49:07+5:30

पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर

Against water supply decision? | दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे?

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर पाणी कपात मागे घेण्याची उपरती सत्ताधाऱ्यांना आली आहे. कपातीसंदर्भात मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचाही पंचनामा महापौर करणार आहे.
पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. दोन मेपासून ही कपात सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीकपात मागे घेतली आणि पाऊस वेळेवर पडला नाही, तर नियोजन कोसळेल. त्यामुळे पाणीकपात मागे घेणार नाही, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पवना धरणातील साठा ३० टक्क्यांवर आल्यानंतर महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणातील २८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परंतु, अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. चिखली, मोशी, चऱ्होली या समाविष्ट गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावर महापौरांनी टँकरवर चालक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

आता जर पाणी कपात मागे घेतली आणि पावसाने ओढ दिली, तर पाण्याचे भीषण संकट ओढावू शकते. त्यामुळे कपात करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळपणाचा तोटा नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी कपात मागे घेण्याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. - नितीन काळजे, महापौर

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांना टँकर लॉबीसाठी टंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी पाणीटंचाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली.

Web Title: Against water supply decision?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.